Happy Friendship Day 2020 (File Image)

‘मैत्री’ (Friendship) या दोन शब्दांमध्ये फार मोठी ताकद एकवटली आहे. मैत्री ही एक अशी गोष्ट आहे, जिला कोणत्याही वयाचे, लिंगाचे, वर्णाचे कशाचेही बंधन नसते. मैत्री हे एक असे नाते आहे, जे कोणत्याही अपेक्षेशिवाय फक्त निर्मळ मनाने आपण जपत असतो. आयुष्यात मित्र नसतील, तर जीवन व्यर्थ आहे, असे म्हटले जाते. तर असा हा फ्रेंडशिप डे (International Friendship Day 2020) दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी (August First Sunday) साजरा केला जातो. यावर्षी 2 ऑगस्ट रोजी हा मैत्रीदिन साजरा केला जाणार आहे. कोणत्याही क्षणी, कोणत्याही वेळी, जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर आपल्या मागे ठामपणे उभा राहतो तो खरा मित्र, चुकलो तर रागावणारा, आपल्या आनंदात आनंद मानणारा, हक्काने हाक देणारा, अशी मित्राची ढोबळमानाने व्याख्या केली जाते.

कोणत्या घरात जन्म घ्यायचे हे आपल्या हातात नसते, मात्र माया, प्रेम, जिव्हाळा असलेल्या या मैत्रीच्या नात्याची आपण स्वतःहून निवड करतो. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आयुष्यात मैत्रीच्या नात्याची जागा फार खास असते. मैत्रीचे नाते हे जगातील सर्वात खास नात्यांपैकी एक मानले जाते. तर अशा या मैत्रीदिनी Wishes, HD Images, Greetings, Messages, SMS, WhatsApp Status च्या माध्यमातून शुभेच्छा देऊन साजरा करा आयुष्यातील खास नात्याचा हा दिवस.

'फ्रेंडशिप डे'च्या शुभेच्छा!  

Happy Friendship Day 2020

Happy Friendship Day

Happy Friendship Day 2020

मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

Happy Friendship Day 2020

जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Friendship Day 2020

हॅप्पी फ्रेंडशिप डे

Happy Friendship Day 2020

मैत्रीदिनाच्या शुभेच्छा!

Happy Friendship Day 2020

दरम्यान, जागतिक फ्रेंडशिप डे क्रूसेडकडून 30 जुलै 1958 रोजी संयुक्त राष्ट्र संघात आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. यानंतर, हा दिवस विधिवत अनेक देशांमध्ये साजरा करण्यात आला. असे म्हटल जाते की,  फ्रेंडशिप डे अमेरिकन काँग्रेसमध्ये 1935 मध्ये सर्वप्रथम साजरा करण्यात आला आणि तेव्हापासून ऑगस्टचा पहिला रविवार फ्रेंडशिप डे म्हणून जाहीर करण्यात आला. (हेही वाचा: Friendship Day च्या शुभेच्छा देण्यासाठी आपल्या मित्रांसोबत Video Calling दरम्यान 'या' भन्नाट गोष्टी करुन द्या Surprise!)

यंदा कोरोना व्हायरसमुळे फ्रेन्डशिप डे मित्रांना भेटून साजरा करता येणार नाही. मात्र तुम्ही आपल्या मित्रांसह व्हर्च्युअल पार्टी करू शकता. आपण आपल्या दोस्तांसह व्हिडिओ कॉल करण्याची एक वेळ ठरवून घेऊ शकता आणि त्याद्वारे कॉन्फरन्सिंग पार्टीचा आनंद घेऊ शकता.