सप्टेंबर महिन्यात सेलिब्रेशनसाठी खूप दिवस आहेत. त्यापैकीच एक म्हणजे 15 सप्टेंबर! भारतात 15 सप्टेंबर हा दिवस इंजिनियर्स डे (Engineer's Day) म्हणून साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात काम करणार्या इंजिनिअर्सच्या सन्मानार्थ कृतज्ञता व्यक्त केली जाते. भारतात या क्षेत्राची पायाभरणी करणारे अभियंता आणि वैज्ञानिक Mokshagundam Visvesvaraya यांच्या जन्म दिवसाचे औचित्य साधत 15 सप्टेंबर हा अभियंता दिवस म्हणून साजरा केला जातो. मग तुमच्या इंजिनिअर मित्र मंडळींना, नातेवाईकांना, भावंडांना इंजिनियर्स डे च्या शुभेच्छा देण्यासाठी ही ग्रिटिंग्स, HD Images, Wallpapers, Wishes सोशल मीडीयात Facebook, Instagram द्वारा शेअर करत या दिवसाचा आनंद द्विगुणित करू शकता.
मोक्षगुंडम विश्वैश्वरया यांचा जन्मदिवस भारतात अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. विश्वैश्वरया यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या गौरवासाठी भारत सरकारने 15 सप्टेंबर या तारखेस अभियंता दिन साजरा करण्याचे ठरवले. भारत सरकारने त्यांना 'भारत रत्न' पुरस्काराने गौरविले होते. Engineer's Day: APJ Abdul Kalam, E Sreedharan ते Sundar Pichai भारताच्या 'या' अव्वल इंजिनियर्सचा असावा सार्थ अभिमान!
अभियंता दिनाच्या शुभेच्छा
भारतात 15 सप्टेंबरला अभियंता दिन साजरा केला जात असला तरीही प्रत्येक देशात अभियंता दिन साजरा करण्याची तारीख वेगवेगळी आहे. युनेस्कोने जागतिक स्तरावर अभियंता दिवस 4 मार्च दिवशी साजरा करण्याचे ठरवले आहे.