
Happy Doctors’ Day 2023 Messages: भारतात दरवर्षी राष्ट्रीय डॉक्टर्स दिन आणि राज्यात कृषी दिन 1 जुलै रोजी साजरा केला जातो. 1 जुलै रोजी देशाचे महान डॉक्टर आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉ. बिधानचंद्र रॉय यांची जयंती आणि पुण्यतिथीही साजरी केली जाते. बिधानचंद्र रॉय हे पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री होते, ते डॉक्टर होते. दरम्यान, 1 जुलै रोजी कृषी दिनही साजरा केला जातो. 1991 मध्ये भारतात प्रथमच राष्ट्रीय डॉक्टर्स दिन साजरा करण्यात आला असुन तेव्हापासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली, डॉक्टर प्रती आदर दाखवण्यासाठी डॉक्टर्स डेनिमित्त शुभेच्छा तुम्ही देऊ शकता. तुम्ही हे संदेश, व्हॉट्सअॅप शुभेच्छा, कोट्स आणि फेसबुक ग्रीटिंग्ज शेअर करून राष्ट्रीय डॉक्टर्स डेच्या शुभेच्छा देखील देऊ शकता. चला तर पाहूया खास शुभेच्छा संदेश.
पाहा, खास शुभेच्छा संदेश





रुग्णांच्या स्वास्थ्यासाठी काम करणाऱ्या देशभरातील डॉक्टरांचा सन्मान करण्यासाठी 1 जुलै हा दिवस 'राष्ट्रीय डॉक्टर दिन' साजरा केला जातो, दरम्यान खास शुभेच्छा संदेश पाठवून तुम्ही त्यांच्या प्रती आदर व्यक्त करू शकता. कोरोनामध्ये केलेल्या रुग्ण सेवेमुळे डॉक्टर बद्दलचा आदर आता आणखी वाढला आहे.