
Happy Datta Jayanti Marathi Wishes: दत्तात्रय हा शब्द 'दत्त' व 'आत्रेय' अशा दोन शब्दांनी बनला आहे. 'दत्त' या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा. आणि 'अत्रेय' म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा. श्री दत्तात्रयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत. अनेक भाविक दत्त जयंतीच्या दिवशी दिवसभर उपवास करतात. तसेच दत्त मंदिरात जाऊन दत्तात्रयाची पूजा करतात. हे व्रत केल्याने भक्ताच्या मनोकामना पूर्ण होतात. दत्तात्रेयामध्ये 'गुरू' आणि 'देवता' या दोघांचाही मिलाफ असल्याने त्यांना 'गुरूदेव दत्त', असं म्हटलं जातं. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर या दत्तात्रयांचा जन्म झाला. म्हणूनच हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो.
यंदाही अनेक महाराष्ट्रातील अनेक दत्तक्षेत्रांवर दत्तजयंती साजरी करण्यासाठी लाखो भक्त उपस्थित राहतील किंबहुना आपल्या दत्त गुरुंच्या भक्तिरसात न्हाऊन निघतील. अशा भक्तांना मराठमोळ्या Greetings,Messages, Facebook, GIFs आणि WhatsApp Status च्या माध्यमातून द्या खास शुभेच्छा. Datta Jayanti 2019 Messages: दत्तगुरूंचा अगाध महिमा अगदी मोजक्या शब्दांत व्यक्त करुन Wishes, Greetings, Facebook आणि WhatsApp Status च्या माध्यमातून द्या दत्त जयंती च्या शुभेच्छा





पाहा व्हिडिओ
दत्त जयंती निमित्ताने 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' च्या जयघोषात सारा आसंमत निनादून उठेल आणि सर्व भाविकांना आपल्या प्रिय दत्तगुरुंना भेटण्याची आस लागेल. अशा भक्तिमय वातावरणात दत्तजयंती साजरी करण्यासाठी सर्व भक्तांना लेटेस्टली कडून दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा