
Happy Dahi Handi 2019 HD Images: श्री कृष्ण जन्माष्टमी निमीत्त दही हंडी उभारण्याची आणि हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्याची मोठी परंपरा हिंदू संस्कृतीत आहे. भगवान विष्णूचा अवतार मानला जाणाऱ्या श्री कृष्ण जन्मादिनाचा आनंद साजरा करण्यासाठी या उत्सवाचे आयोजन केले जाते. महाराष्ट्, गुजरात आणि उर्वरीत भारतात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, मुंबई आणि महाराष्ट्रातील दहीहंडी उत्सवास एक वेगळेच वलय प्राप्त झालेले पाहायला मिळते. शेकडोंच्या संख्येने जमलेले गोविंदा आणि या गोविंदांच्या गोविंदा पथकांनी फोडलेल्या उंचच उंच हंड्या हा एक अंगावर रोमांच उभे करणारा क्षण असतो. अशा या उत्साहाच्या क्षणी आपण आपला आनंद डिजिटल माध्यमांतून आपले मित्र, नातेवाईक, परिचीत आणि सहकाऱ्यांसोबत साजरा करु शकता. त्यासाठी शेअर करा HD Greetings, Wallpapers, Wishes आणि आप्तेष्टांना द्या दहीहंडी उत्सव शुभेच्छा.
दहीहंडी उत्सवानिमत्त मराठी शुभेच्छा HD इमेज क्र. 1

दहीहंडी उत्सवानिमत्त मराठी शुभेच्छा HD इमेज क्र. 2

दहीहंडी उत्सवानिमत्त मराठी शुभेच्छा HD इमेज क्र. 3
दहीहंडी उत्सवानिमत्त मराठी शुभेच्छा HD इमेज क्र. 4

दहीहंडी उत्सवानिमत्त मराठी शुभेच्छा HD इमेज क्र. 5

महाराष्ट्रात दहीहंडी उत्साहाची मोठी परंपरा आहे. अनेक सामाजिक संस्था, राजकीय नेते, पक्ष, संघटना दहीहंडीचे आयोजन करतात. राज्यभरातील विविध मंडळांची गोविंदा पथकं ही दहीहंडी फोडण्यासाठी उपस्थिती लावत असतात. अलिकडील काही वर्षांमध्ये दहीहंडी हा राजकीय विषय झाला आहे. कोणाची हंडी उंच यावरुन अनेकदा प्रतिष्ठेचा विषय केला जातो. तर, उंचच उंच हंडी फोडताना अनेक गोविंदा जखमी होतात. काही वेळा हंडी फोडताना घडलेला अपघात हा एखाद्या गोविंदाच्या जीवावरही बेततो. त्यामुळे उंच हंड्या उभारुच नये अशी मागणी काही सामाजिक कार्यकर्ते, संस्था करतात. हे प्रकरण न्यायालयातही गेले होते. न्यायालयानेही उंच हंड्या उभारु नयेत. तसेच, हंडी उभारताना आवश्यक ती वैद्यकीय सेवा तयार ठेवावी असे म्हटले होते. दरम्यान, ज्यांना केवळ आनंदच साजरा करायचा आहे अशी मंडळी Dahi Handi HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुनही हा आनंद साजरा करु शकतात.