Children's Day 2023 Messages: बालदिन (Children's Day) दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. देशात दरवर्षी हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या विशेष दिवशी शाळांमध्ये भाषण स्पर्धा आयोजित केल्या जातात. मुलांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देण्यासाठी बालदिन साजरा केला जातो. भारतात 1956 पासून बालदिन (Baldin) साजरा केला जात होता. बालदिनानिमित्त शाळांमध्ये अभ्यासाऐवजी खेळ, भाषणे व इतर विविध स्पर्धांचे कार्यक्रम आयोजित केले जातात. पंडित नेहरूंना मुलांवर खूप प्रेम होते, म्हणून मुले त्यांना चाचा नेहरू म्हणत असतं. जवाहरलाल यांनी मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी मोठं योगदान दिलं आहे. ज्यामुळे भविष्यात एक चांगला समाज निर्माण होण्यास मदत झाली.
बालदिन साजरा करण्यामागचा उद्देश पंडित नेहरूंना आदरांजली अर्पण करणे हा आहे. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर त्यांची जयंती भारतात बालदिन म्हणून निवडण्यात आली. तेव्हापासून 14 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जाऊ लागला. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे मुलांवर खूप प्रेम होते. त्यामुळे त्यांची जयंती बालदिन म्हणून साजरी केली जाते. या दिवशी तुम्ही आपल्या बालपणीच्या मित्र-मैत्रिणींना खास Quotes, Images, WhatsApp Status, SMS च्या माध्यमातून बालदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.
जगातील अशा काही गोष्टी आहेत
ज्या विकत घेता येत नाही
त्यातील एक गोष्ट म्हणजे बालपण
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जगातील सर्वात चांगला वेळ,
जगातील सर्वात चांगला दिवस,
जगातील सर्वात सुंदर क्षण
फक्त बालपणीच मिळतात.
Happy Children’s Day
मुलंही देवाघरची फुलं आनंद पसरवतात
आणि सुख देतात.
त्यांच्यावर भरपूर प्रेम करा
आणि नाजूक हातांनी सांभाळा.
Happy Children’s Day
सकाळ नाही, संध्याकाळ नाही
चोवीस तास मस्ती आणि काही क्षणांचा अभ्यास होता
रम्य असा लहानपणीचा काळ होता
बालदिनासाच्या हार्दिक शुभेच्छा.
कोनाड्यात पडलेल्या
जुन्या आठवणींना
पुन्हा एकदा डोळ्यासमोर आणायचं आहे,
आज आपलं हरवलेलं बालपण,
पुन्हा नव्याने जगायचं आहे,
बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा !
जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाल्यावर त्यांचे पहिले प्राधान्य मुलांच्या शिक्षणाला होते. शिक्षणासाठी त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यासारख्या देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांची स्थापना केली. या संस्थांनी मुलांचे आणि देशाचे भविष्य सुधारण्यात अभूतपूर्व योगदान दिले आहे. मोफत प्राथमिक शिक्षण, कुपोषण रोखण्यासाठी शाळांमध्ये मोफत जेवण इत्यादींचाही त्यांनी समावेश केला.