
14 नोव्हेंबर हा भारतामध्ये बालदिन (Children's Day) म्हणून साजरा केला जातो. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru) यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधत त्यांना लहान मुलं प्रिय होती म्हणून हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. बालपण हा आयुष्यातील सगळ्यात रम्य काळ असतो. कोणत्याही चिंता, काळजी शिवाय प्रत्येक क्षण मनमुराद जगण्याचा हा काळ मौल्यवान असतो. आता काळ सरला आयुष्याचा तो टप्पा मागे पडला पण आजचा एक दिवस त्या काळातील रम्य आठवणी आठवून आपल्या आयुष्यातील ते सुंदर क्षण आपल्या बालपणीच्या मित्रमंडळींसोबत साजरा करण्यासाठी यंदाचा बालदिन देखील साजरा करा. तुमच्या मित्रमंडळींना, प्रियजणांना बालदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्र, Wishes, Greetings, Messages, HD Images शेअर करून हा दिवस साजरा करू शकता.
20 नोव्हेंबर 1954 मध्ये बालदिन साजरा करण्याची घोषणा यूएनने केली होती. भारतातही हा दिवस 20 नोव्हेंबरलाच साजारा केला जात असे. दरम्यान, 27 मे 1964 रोजी पंडित जवाहरलाल नेहरु यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर नेहरुंचा जन्मदिन हा बालदिन म्हणून भारतात साजरा जाऊ लागला. पंडीत नेहरु यांना असलेली लहान मुलांची आवड म्हणून देशभरात बालदिन साजरा करण्यास सुरूवात झाली. Children's Day Special Songs: बालदिना निमित्त बच्चे कंपनीसाठी त्यांची आवडती '10' बडबडगीते, नक्की ऐका .
बालदिनाच्या शुभेच्छा

वयाने मोठे पण मनाने लहान असलेल्या
प्रत्येकाला बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

बालदिनानिमित्त सार्या
चिमुकल्यांना हार्दिक शुभेच्छा!

बालपणी होते स्वछंद खेळाचे क्षण..
बालपणी होते सर्व सुखाचे धन..
बालपणीच्या आठवणीत हरपते मन..
येणार नाहीत कधीच ते सोनेरी क्षण..
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

देशाच्या प्रगतीचा आम्ही आहोत आधार,
आम्ही करू चाचा नेहरूंचे स्वप्न साकार,
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

लहानपण देगा देवा
मुंगी साखरेचा रवा
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
बालदिनाच्या निमित्ताने लहान मुलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शाळेमध्येही हा दिवस खास पद्धतीने साजरा केला जातो. लहानमुलांमधील निरागस पण जपण्यासाठी हा दिवस खास अंदाजात साजरा केला जातो.