Buddha Purnima 2021 (Photo Credits-File Image)

Happy Buddha Purnima 2021 Images: आज 26 मे  रोजी बौद्ध धर्माचे संस्थापक भगवान गौतम बुद्ध यांची जयंती पार पडणार आहे. हा दिवस बुद्ध पौर्णिमा (Buddha Purnima)  म्हणून सुद्धा ओळखला जातो. भारतासह जगभरातील 180 देशात हा सोहळा बौद्ध धर्माचे अनुयायी अगदी निष्ठेने साजरा करतात. दरवर्षी यानिमित्त मोठे सोहळे पार पडतात मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरीच राहून बुद्ध पौर्णिमा साजरी करावी लागणार आहे. यंदाच्या बुद्ध पौर्णिमेला खास बनवण्यासाठी या मराठी शुभेच्छा, Wishes, Greetings, WhatsApp Status, Facebook Images च्या माध्यमातून शेअर मित्र, नातेवाईक व कुटुंबासोबत शेअर करत साजरा करा आजचा दिवस.(Buddha Purnima 2021 Rangoli Designs: बुद्ध पौर्णिमेला काढा 'या' सोप्या आणि आकर्षक रांगोळी डिझाईन)

वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान गौतम बुद्धांना दिव्य ज्ञानप्राप्ती झाली. त्याला दिव्य ज्ञान, बुधत्त्व किंवा निर्वाण असेही म्हटले जाते. ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर सामान्य सिद्धार्थ गौतम यांची ओळख ‘बुद्ध’ अशी झाली. बुद्ध ही व्यक्ती नव्हे ती ज्ञानाची अवस्था आहे. ‘बुद्ध’ म्हणजे अतिशय ज्ञानी मनुष्य म्हणून ओळखला जातो. गौतम बुद्धांना ज्या पिंपळाच्या वृक्षाखाली ‘बुद्धत्व’ प्राप्त झाले त्या वृक्षाला ‘बोधिवृक्ष’म्हणजेच ज्ञानाचा वृक्ष म्हणून देखील ओळखले जाते.(Buddha Purnima Messages 2021: बुद्ध पौर्णिमा मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Quotes, WhatsApp Status शेअर करुन साजरी करा बुद्ध जयंती!)

Buddha Purnima 2021 (Photo Credits-File Image)
Buddha Purnima 2021 (Photo Credits-File Image)
Buddha Purnima 2021 (Photo Credits-File Image)
Buddha Purnima 2021 (Photo Credits-File Image)

Buddha Purnima 2021 (Photo Credits-File Image)

भारताप्रमाणे नेपाळ, चीन, जपान, लायवान, कोरिया, लाओस, व्हिएतनाम, थायलंड, कंबोलिया, मलेशिया, श्रीलंका, म्यानमार, इंडोनेशिया अशा अनेक देशात बुद्ध पौर्णिमा मोठया उत्साहात साजरी केली जाते. यंदाचा हा सण गौतम बुद्धांचे विचार तुमच्या आयुष्यात घेऊन येवो. या दिवसाच्या समस्त बौद्ध बांधवांना खूप खूप शुभेच्छा!