
आनंदाचा आणि उपभोगाचा दिवस म्हणून भोगी (Bhogi 2021) या सणाकडे पाहिले जाते. भोगी हा इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला सण आहे, जो संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा केला जातो. इंद्र देवाने धरतीवर उदंड पिके पिकावी म्हणून प्रार्थना केली होती, म्हणूनच पिके वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी या अपेक्षेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे. पावसाळ्यानंतर थंडीचे दिवस सुरु असतात, शेतातील पिकांची कापणी होऊन सर्व प्रकारच्या भाज्या बाजारात आलेल्या असतात. त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो. हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, चाकवत, फ्लॉवर अशा अनेक भाज्या घालून भोगीची भाजी बनवली जाते.
बाजरी आणि तीळ हे दोन्ही उष्ण गुणधर्माचे पदार्थ आहेत. थंडीच्या काळात शरीराला उष्णता मिळवून देण्यासाठी भोगीच्या दिवशी या पदार्थांचा जेवणात विशेष समावेश केला जातो. भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठून घर आणि अंगण स्वच्छ करावे. दारासमोर रांगोळी काढावी. काही ठिकाणी या दिवशी अभ्यंग स्नानाची परंपरा आहे. तसेच या दिवशी तीळ टाकलेल्या पाण्याने अंघोळी करण्याची प्रथा आहे. तर अशा या खास प्रसंगी मराठी Messages, Greetings, HD Images, Wallpaper, WhatsApp Status, Wishes शेअर करून तुम्ही देऊ शकता भोगीच्या शुभेच्छा.





(हेही वाचा: Makar Sankranti 2021 Bornhan: मकर संक्रांत निमित्त लहान मुलांना बोरन्हाण का घातले जाते? कशी कराल तयारी? जाणून घ्या)
दरम्यान, भोडी व संक्रांतीचा सण महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांत साजरा होतो. उत्तर भारतात संक्रातीला खिचडी संक्रांती असे म्हणतात. विशेष करुन पंजाबमध्ये मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला 'लोहरी' हा सण जल्लोषात साजरा केला जातो. तर बंगालमध्ये संक्रांतीला ‘तिळुआ संक्रांती’ व ‘पिष्टक संक्रांती’ असे म्हणतात. दक्षिणेत याच वेळी पोंगल नावाचा तीन दिवस चालणारा उत्सव असतो. आसाममध्ये ‘भोगली बहू’ म्हणून हा सण साजरा होतो.