Happy Ayurveda Day 2021 Images: राष्ट्रीय आयुर्वेद दिनाच्या शुभेच्छा Wishes, Messages द्वारा शेअर करत साजरी करा धन्वंतरी जयंती
Happy Ayurveda Day | PC: File Image

दिवाळी सणाची सुरूवात धनतेरसने (Dhanteras) होते. हिंदू धर्मीयांसाठी खास असलेला हा दिवस जसा कुबेर जयंती म्हणून साजरा केला जातो तशाच धनत्रयोदशी दिवशी धन्वंतरीची देखील पूजा केली जाते. अश्विन कृष्ण त्रयोदशीचा दिवस  धन्वंतरी जयंती (Dhanvantari Jayanti) म्हणून ओळखला जातो. भगवान धन्वंतरि (Lord Dhanvantari) यांना वैद्यकशास्त्रातील आयुर्वेदाचे जनक मानले जाते. धन्वंतरी हे आयुर्वेदाचे जनक असल्यानेच हा दिवस राष्ट्रीय आयुर्वेद दिन (National Ayurveda Day)  म्हणूनही भारतात साजरा करण्याची पद्धत आहे. भारतामध्ये मोदी सरकारने 2016 राष्ट्रीय आयुर्वेद दिनाची (National Ayurveda Day) परंपरा सुरु केली. यंदा हे राष्ट्रीय आयुर्वेद दिनाचं सहावं वर्ष आहे. आयुर्वेद दिनाचं औचित्य साधत तुम्ही प्रियजणांना शुभेच्छा देण्यासाठी ही मराठमोळी ग्रीटिंग्स, मेसेजेस, Wishes, HD Images सोशल मीडीयामध्ये फेसबूक, ट्वीटर, इंस्टाग्राम यांच्या माध्यमातून शेअर करू शकता. नक्की वाचा: Dhanteras 2021 HD Images: धनत्रयोदशी निमित्त Wishes, Messages, WhatsApp Status, Facebook Post च्या माध्यमातून मित्रपरिवाला द्या शुभेच्छा! 

जगभरामध्ये मागील दीड दोन वर्ष कोरोना संकट थैमान घालत होते. अशामध्ये कोविड 19 संकटाचा सामना करण्यासाठी आयुर्वेदानेही अनेकांना मदत केली आहे. आयुर्वेद उपचाराच्या मदतीने रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अनेक उपचार, काढे, गोळ्या अनेकांच्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग झाला आहे. मग त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत या दिवसाप्रति समाजात जागृती वाढवण्यासाठी खास शुभेच्छापत्र शेअर करू शकता.

आयुर्वेद दिनाच्या शुभेच्छा

Happy Ayurveda Day | PC: File Image
Happy Ayurveda Day | PC: File Image
Happy Ayurveda Day | PC: File Image
Happy Ayurveda Day | PC: File Image

भगवान धन्वंतरि यांना भगवान विष्णूचे आणखी एक रूप मानले जाते. त्यांच्या प्रतिमेमध्ये चार हातात चार वस्तू आहेत. आयुर्वेदामध्ये या चारही वस्तूंचा हमखास वापर केला जातो.  आजारांना दूर ठेवण्यासाठी आणि निरोगी आणि सुदृढ आरोग्यासाठी आयुर्वेदाचा प्रसार करण्याचं मुख्य लक्ष्य आहे.