
Happy Army Day 2021 Images: प्रत्येक वर्षी 15 जानेवारीला भारतीय सेना दिवस साजरा केला जातो. तर स्वतंत्र भारताचे पहिले सेनाध्यक्ष के.एम. करिअप्पा यांनी या दिवशी आपला पदभार स्विकारल्याने हा दिवस साजरा केला जातो. 15 जानेवारी 1949 ला ब्रिटीशांच्या काळातील भारतीय सेनेतील अंतिम शीर्ष कमांडर जनरल रॉय फ्रांसिस बुचर (General Sir Francis Butcher) हा पदाभार स्वीकारला होता. निवृत्त झाल्यानंतर 33 वर्षांनी करिअप्पा यांना 'फिल्ड मार्शल' या उपाधीने सन्मानित करण्यात आले. या दिवशी सैन्यात परेडसह इतर अन्य कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
तर यंदाच्या भारतीय सेना दिनानिमित्त शुभेच्छांसह Messages, Wishes पाठवून करा जवानांच्या शौर्याला सलाम करुया.(Army Day 2021 Wishes: भारतीय सेना दिनाच्या शुभेच्छा Messages, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन शूरवीरांना द्या अनोखी मानवंदना!)





28 जानेवारी 1899 मध्ये कर्नाटकच्या कुर्गमध्ये शनिवर्सांथि येथे करिअप्पा यांचा जन्म झाला. त्यांच्या परिवारातील लोक प्रेमाने त्यांना 'चिम्मा' म्हणत. करिअप्पा यांनी 20 वर्षांचे असताना त्यांनी ब्रिटिश भारतीय सेनेत नोकरी करायला सुरुवात केली. सेकंड लेफ्टिंनेंट पदापासून करिअप्पा यांनी नोकरीला प्रारंभ केला. करिअप्पा यांनी 1947 मध्ये भारत-पाक युद्धात भरीव कामगिरी केली. 15 जानेवारी 1949 मध्ये भारताचे सेनाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. यानिमित्तानेच दरवर्षी 15 जानेवारीला 'सेना दिवस' साजरा केला जातो.