
Army Day 2021 Wishes: येत्या 15 जानेवारीला म्हणजेच उद्या देशभरात आर्मी दिवस म्हणजेच भारतीय सेना दिवस साजरा केला जातो. स्वतंत्र भारताचे पहिले सेनाध्यक्ष के.एम.करियप्पा यांनी या दिवशी त्यांच्या पदाचा स्वीकार केला. करियप्पा यांनी 15 जानेवारी 1949 साली ब्रिटीशांच्या काळातील भारतीय सेनेतील अंतिम शीर्ष कमांडर जनरल रॉय फ्रांसिस बुचर हा पदाभार स्वीकारला होता. यानिमित्तानेच दरवर्षी 15 जानेवारीला 'आर्मी दिन' (Army Day 2021) साजरा केला जातो. या दिवशी दिल्ली आणि भारतीय सेनेच्या मुख्यालयात कार्यक्रम होतात. यंदा कोरोनाचे सावट असल्यामुळे हा कार्यक्रम सर्व नियमांचे पालन करुन केला जाईल. मात्र आपल्या मातृभूमीसाठी अहोरात्र झटणा-या शूरवीरांना अनोखी मानवंदना देण्यासाठी तुम्ही सोशल मिडियाचा आधार घेऊ शकता.
सोशल मिडियाच्या माध्यमातून Facebook, WhatsApp Status च्या माध्यमातून तुम्ही शूरवीरांना अनोखी मानवंदना देऊन हा दिवस साजरा करु शकता.

हेदेखील वाचा- Army Day 2021 Date, History & Significance: 15 जानेवारी रोजी सेना दिवस का साजरा करतात ? जाणून घ्या या बद्दल अधिक माहिती




भारतीय सैन्याचे करावे तितके कौतुक कमीच आहे. त्यांचे आपल्यावरी ऋण हे कधीच फेटता न येण्यासारखे आहे. आपल्याला निर्धास्त झोपता यावे, आपले कुटूंब सुरक्षित राहावे म्हणून स्वत: अहोरात्र सीमेवर राहून देशाचे रक्षण करणारे भारतीय सैन्याचे योगदान खूपच अनमोल आहे. त्यामुळे ते शब्दांत व्यक्तच होऊ शकणार नाही. मात्र या गोष्टीची जाणीवर प्रत्येक भारतीयाला व्हावी म्हणून भारतीय सेना दिनानिमित्त तुम्ही एकमेकांना शुभेच्छा संदेश पाठवून हा दिवस साजरा करु शकता.