
Happy Army Day 2020: प्रत्येक वर्षी 15 जानेवारीला भारतीय सेना दिन साजरा करण्यात येतो. जेव्हा लेफ्टिनेंट जनरल केएम करियप्पा यांनी जनरस सर फ्रांन्सिस बुचर यांना जानेवारी 1949 मध्ये भारताचे कमांडर-इन-चीफ म्हणून पदभार सांभाळले होते. भारतीय सेना दिन हा देशातील तमाम सैनिकांच्या पराक्रमाला सलाम करण्याचा दिवस मानला जातो. निस्वार्थ सेवा आणि बंधुभावाने देशाचे नेहमीच रक्षण करताना दिसून येतात. भारतीय सेना अमेरिका, रुस आणि चीन यांसारख्या महाशक्तीशाली देशांच्या सेनेसारखेच शत्रुंवर मात करण्यासाठी दोन हात करण्यास समर्थ असल्याने त्यांना जगातील शक्तिशाली सेनेमधील एक मुख्य घटक म्हणून ओळखले जाते.
दिल्लीत अमर जवान ज्योति नावाचे स्मारक असून त्याचे निर्माण 1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धानंतर युद्धात शहीद झालेल्या भारतीय सेनेच्या शूरवीरांच्या स्मरणार्थ त्यांना या दिवशी आदरांजली वाहिली जाते. तर भारतीय सेना दिनाच्या शुभेच्छा मराठमोळी ग्रीटिंग्स, Images, WhatsApp Status, Messages च्या माध्यमातून शेअर करून सलाम करा भारतीय लष्कराच्या जवानांना! (Army Day 2020: 15 जानेवारीला साजरा केला जाईल सैन्य दिवस; जाणून घ्या कारण आणि वैशिष्ठ्ये)
>> रक्षणासाठी निस्वार्थ सेवा करणाऱ्या भारतीय सैन्याच्या कर्तृत्वास सलाम!

>>भारतीय सेना दिन
देशासाठी झटणाऱ्या शूरवीरांना सलाम!

>>देशाच्या सीमेवर रक्षण करताना आपले सर्वस्व त्यागणाऱ्या भारतीय जवानांना सलाम!

>>राष्ट्रीय शान आणि गर्वाचे प्रतिक असणाऱ्या भारतीय जवानांना माझा सलाम!

>>कितीही श्रीमंती असली तरीही हा पोशाख आणि हा रुबाब तुम्ही विकत घेऊ शकत नाही तो कमवावा लागतो
भारतीय सेनेला सलाम!

भारतीय सेना दिवस दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. तसेच शहीदांच्या विधवा पत्नींना सैन्य पदके व इतर पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यावेळी आर्मी डे परेड थोडी खास असणार आहे. चौथ्या पिढीतील तानिया शेरगिल नावाची महिला अधिकारी 15 जानेवारी रोजी सैन्य दिन परेडचे नेतृत्व करणार आहे.