दरवर्षी 15 जानेवारीला भारतीय सेना दिवस (Army Day) साजरा केला जातो. स्वतंत्र भारतचे पहिले सेनाध्यक्ष के.एम. करिअप्पा (K. M. Cariappa) यांनी या दिवशी त्यांच्या पदाचा स्वीकार केला. या सोहळ्याचे औचीत्य साधून दरवर्षी हा दिवस धुमधडाक्यात साजरा केला जातो. करिअप्पा यांनी 15 जानेवारी 1949 ला ब्रिटीशांच्या काळातील भारतीय सेनेतील अंतिम शीर्ष कमांडर जनरल रॉय फ्रांसिस बुचर (General Sir Francis Butcher) हा पदाभार स्वीकारला होता. या पदावरून निवृत्त झाल्यानंतर 33 वर्षांनी करिअप्पा यांना 'फिल्ड मार्शल' या उपाधीने सन्मानित करण्यात आले. आज याच दिनाच्या स्मरणार्थ देशभरात भारतीय सेना दिवस साजरा केला जाणार आहे. याच निमित्ताने आपल्या देशाच्या रक्षणार्थ जीवाचीही पर्वा ना करणाऱ्या भारतीय लष्कर जवानांच्या शौर्याला सलाम करणाऱ्या शुभेच्छा देऊन त्यांना स्पेशल फील करून देऊयात याकरिता तुम्ही ही फ्री टू डाउनलोड Messages, HD Images, WhatsApp Status आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करू शकता.
दिल्ली व सेनेच्या मुख्यालयात परेड सहित अनेक कार्यक्रम यादिवशी पार पडतात. दुर्दैवाने या दिवसाबाबत अनेकांना कल्पना सुद्धा नसते, याच आपल्या देशवासियांना आपल्याकडून ही माहिती आणि सोबतच भारतीय सेनेच्या या गौरव दिनाच्या शुभेच्छा देऊन यंदा हा सोहळा साजरा करा. या दिवसाच्या शुभेच्छा देताना शोधाशोध करावी लागू नये याची सोय आम्ही या शुभेच्छापत्रांच्या माध्यमातुन केलेली आहे.
भारतीय सेना दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
भारतीय सेना दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
भारतीय सेना दिनी शहीद वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली
भारतीय सेना दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
हॅप्पी आर्मी डे 2020
करिअप्पा यांनी 20 वर्षांचे असल्यापासून सैन्यात नोकरी स्वीकारली होती. सेकंड लेफ्टिंनेंट पदापासून करिअप्पा यांनी नोकरीला प्रारंभ केला. करिअप्पा यांनी 1947 मध्ये भारत-पाक युद्धात भरीव कामगिरी केली. 15 जानेवारी 1949 मध्ये भारताचे सेनाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. यानिमित्तानेच दरवर्षी 15 जानेवारीला 'सेना दिवस' साजरा केला जातो.