Anant Chaturdashi 2019: अनंत चतुर्दशीचा दिवस हा बाप्पाच्या विसर्जनाचा, बाप्पाला निरोप देण्याचा दिवस. गेले 11 दिवस ज्याची मनोभावे पूजाअर्चा केली, पाहुणाचार केला, लाड केले त्या बाप्पाला जड अंत:करणाने गणेश भक्त अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाला निरोप देतात. एकीकडे गणपती बाप्पा आपल्याला सोडून जाण्याचे दु:ख असते तर दुस-या बाजूला तो पुढच्या वर्षी लवकर येणार हा आनंद मनात कायम असतो. म्हणूनच मोठ्या थाटामाटात, जल्लोषात गणरायाचे विसर्जन केले जाते. त्यासाठी कित्येक गणेश भक्तांनी जोरदार तयारी केली असून बाप्पाचा विसर्जन सोहळा खास व्हावा यासाठी विशेष तयारी करतात.
भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) साजरी केली जाते. दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन या दिवशी करतात. यात घरगुती गणपतींसोबत मंडळांचे मोठाले गणपतींचे विसर्जन याच दिवशी होते. या निमित्ताने बाप्पाच्या लाडक्या भक्तांना Whatsapp Status,Sms च्या माध्यमातून अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा देण्यासाठी कामी येतील या अनंत चतुर्दशीच्या खास शुभेच्छा
हेही वाचा- Ganesh Visarjan 2019 Muhurat: यंदा दीड, 5,7 आणि 10 दिवसांच्या गणपतींचं विसर्जन करण्याचे मुहूर्त काय?
अनंत चतुर्दशी दिवशी विशेषत: मंडळाच्या गणपतीचे विसर्जन केले जाते. त्यामुळे या दिवशी रस्त्यावर प्रचंड गर्दी पाहायला मिळते. यंदाही अशाच जल्लोषात आणि उत्साहात गणपती बाप्पाचे विसर्जन करून 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' च्या जयघोषात गणरायाचा निरोप घेतला जाईल.