Happy Ambedkar Jayanti HD Images 2023: 1891 मध्ये एका गरीब महार कुटुंबात जन्मलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांच्या हक्कांसाठी तत्परतेने लढा दिला. डॉ.भीमराव रामजी आंबेडकर हे भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि न्यायशास्त्रज्ञ होते. दलित समाजावर करण्यात येणाऱ्या अत्याचाऱ्याच्या विरोधात आंबेडकर यांनी लढा दिला, त्यांचे हे कार्य अनेक दलितांसाठी वरदान ठरले आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य सुवर्ण अक्षरात लिहिल्या गेले. आज 14 एप्रिल आहे. जगभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहेत. तर यंदाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त Wishes, Messages, HD Wallpapers च्या माध्यमातून द्या शुभेच्छा!
पाहा खास, शुभेच्छा संदेश
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. तर आंबेडकर हे नेहमीच आपल्या सामाजिक कार्य आजही अनेकांसाठी प्रेरणादायी आहेत. वर दिलेले शुभेच्छा संदेश पाठवून तुम्ही उत्सवाचा आनंद आणखी द्विगुणीत करू शकता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!