Haldi Kunku 2021 Marathi Invitation Format: हळदी कुंकू समारंभासाठी आमंत्रण देताना पाठवा या 'निमंत्रण पत्रिका'
Photo Credit: File Image

Haldi Kunku Marathi Invitation Format: वर्षाच्या सुरवातीला महिलांसाठीचा खास सोहळा म्हणजे हळदी कुंकू. सुवासिनी महिला एकत्र येऊन हा समारंभ साजरा करतात. यामध्ये एक महिला किंवा महिलांचा गट हळदी कुंकू समारंभ आयोजित करतात  आणि त्याला अन्य महिलांना बोलावतात. यामध्ये विशिष्ट पूजा, सण यानिमित्ताने महिलांना आमंत्रित करून त्यांना कपाळावर हळद आणि कुंकू लावले जाते.पान-सुपारी दिली जाते.अत्तर लावले जाते,अंगावर गुलाबपाणी शिंपडले जाते. काही प्रसंगी ओटीही भरली जाते. हल्ली सोशल मिडीयाच्या माध्यमांमुळे WhatsApp वर निमंत्रण दिले जाते. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत खास हळदी कुंकू निमंत्रण पत्रिका आणि वॉट्स एप वर पाठवण्यासाठी खास निमंत्रण.आजकालच्या डिजिटल जगात या पत्रिकांसाठी फार खर्चही येणार नाही. तुम्हाला हवं असल्यास प्रिंट लढून किंवा थेट WhatsApp Messages,Images च्या माध्यमातून देखील तुम्ही मैत्रिणी व नातेवाईकांना या पत्रिका पाठवू शकाल.उदाहरण म्ह्णून हे काही नमुना आमंत्रण मजकूर आणि पत्रिका डिझाईन आम्ही शेअर करत आहोत यात तुमच्या मनानुसार बदल करून तुम्ही वापरू शकता.

नमुना 1

नमुना 2

साजरे करु मकर संक्रमण, करुन संकटावर मात

हास्याचे हलवे फुटुन, तिळगुळांची करु खैरात…

तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!

आमचे येथे दि. .... रोजी साय॑काळी .. वाजता

हळदी कुंकू आयोजिले आहे.

अगत्याचे येणे करावे हे आग्रहाचे निमंत्रण...

पत्ता:

नमुना 3

विसरुनी सारी कटुता

नात्यात तीळगुळाचा गोडवा यावा

एकमेकांच्या साथीने हा आनंदाचा सोहळा रंगावा

दिनांक.. रोजी एकत्र भेटून

हळदी कुंकू करण्याचे योजिले आहे. याकरिता आग्रहाचे आमंत्रण..

नमुना 4

नमुना 5

लेडीज अँड लेडीज

एकदा किटी पार्टी पेक्षा

हळदी कुंकू समारंभात भेटू

कुठे?:

कधी?:

काय मग येताय ना?

हल्ली महिला हळदी कुंकू म्हणुन नाही तर हौस म्हणून साजरा करतात. यंदा कोरोनामुळे प्रत्यक्षपणे सगळ्यांच्या घरी जाणे शक्य नाही तेव्हा अशा वेळी तुम्ही या निमंत्रण पत्रिका वापरू शकता.