
Guru Ravidas Jayanti 2024 Wishes: इंग्रजी दिनदर्शिकेनुसार, संत रविदास जयंती यावर्षी शनिवार, 24 फेब्रुवारी 2024 रोजी साजरा केला जात आहे, तर हिंदू कॅलेंडरनुसार, गुरु रविदास जयंती दरवर्षी माघ महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. संत रविदास हे कबीरदासांचे समकालीन व गुरुभाई असल्याचे मानले जाते. त्यांचा जन्म 1398 मध्ये उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील गोवर्धनपूर गावात माघ पौर्णिमेच्या दिवशी झाला. पंजाबमध्ये ते रविदास म्हणून ओळखले जातात, तर उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशात ते रैदास म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म रविवारी झाला असे मानले जाते, म्हणून त्यांचे नाव रविदास ठेवण्यात आले,या विशेष प्रसंगी, तुम्ही या हिंदी शुभेच्छा, व्हॉट्सॲप मेसेज, कोट्स, फेसबुक ग्रीटिंग्सद्वारे गुरु रविदास जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकता.
पाहा खास शुभेच्छा संदेश:





संत रविदासजींचे 'मन चंगा ते काठोटी में गंगा' हे विधान आजही लोकप्रिय आहे. गुरु रविदास जयंतीच्या दिवशी त्यांचे अनुयायी मोठ्या संख्येने एका ठिकाणी जमतात आणि रॅली काढतात, भजन आणि कीर्तने गातात आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याची शपथ घेतात.