
प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेची तारीख खूपच पुण्यवान मानली गेली आहे, परंतु आषाढ महिन्याच्या पौर्णिमेचे महत्त्व अधिक आहे. ही गुरु पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. प्रत्येकाच्या आयुष्यात विविध टप्प्यावर आई, वडील, शिक्षक अशा विविध रूपात गुरू समान व्यक्ती येतात. हिंदू धर्मियांच्या श्रद्धेनुसार, व्यास पौर्णिमा (Vyas Purnima) दिवशी गुरू पौर्णिमा साजरी करून त्यांच्याप्रति आदर, कृतज्ञता व्यक्त केली जाते. गुरु वेद व्यासांनी पहिल्यांदाच मानवजातीला चारही वेदांचे ज्ञान दिले असल्यामुळे त्यांना प्रथम गुरू मानले जाते आणि आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरु पूर्णिमा आणि व्यास पौर्णिमा म्हणतात. यावेळी गुरु पौर्णिमेचा सण 23 जुलै रोजी साजरा करण्यात येणार आहे. धर्मग्रंथात भगवंतांपेक्षा गुरुच्या स्थानास उच्च स्थान देण्यात आले आहे, म्हणून गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूची विशेष उपासना करण्याचा नियम आहे. (Maharashtra Bendur 2021 Messages: बेंदूर सणाचे औचित्य साधून खास Whatsapp Status, Wallpapers, HD Images च्या माध्यमातून द्या शेतकरी बांधवांना शुभेच्छा )
यंदा कोरोनाच्या परिस्थितीमुळे गुरू पौर्णिमेला गुरुला नमन करण्यासाठी तुम्हाला त्यांना भेटता येईलच असे नाही. मात्र सोशल मिडीयाच्या माध्यमातून तुम्ही ही मराठमोळी शुभेच्छापत्र, Messages, Images, WhatsApp Status पाठवून शुभेच्छा देऊ शकता.




असे म्हटले जाते की, वेद व्यास यांनीच सनातन धर्माचे चार वेद स्पष्ट केले. या व्यतिरिक्त ते श्रीमद् भागवत, महाभारत, ब्रह्मसूत्र, मीमांसा व्यतिरिक्त 18 पुराणांचे लेखक मानले जातात आणि त्यांना आदिगुरूंच्या नावाने संबोधले जाते.