
Gudi Padwa 2021 Wishes in Sanskrit: यावर्षी 13 एप्रिल रोजी गुढी पाडवा उत्सव साजरा केला जाणार आहे. हा उत्सव गोवा, महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील अनेक राज्यांत साजरा केला जातो. या दिवसापासून मराठी नववर्षाला सुरूवात होते. तसेच नवरात्री पर्वाची सुरुवातदेखील या दिवसापासून होते. गुढी पाडवा भारताच्या दक्षिणेकडील प्रांतांमध्ये उगाडी म्हणून देखील ओळखला जातो. असं म्हटलं जात की, भगवान ब्रह्माने या दिवशी विश्वाची निर्मिती केली.
गुढी पाडव्यातील गुढी या शब्दाचा अर्थ आहे 'विजय पताका' आणि पाडव्याचा अर्थ प्रतिपदा तिथी असा आहे. चैत्र शुक्ल पक्षाच्या प्रतिपदाच्या तारखेला गुढी पाडवा सणानिमित्त प्रत्येक घरात विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारली जाते. या दिवशी गुढी उभारल्याने घरात सुख आणि समृद्धी नांदते आणि वाईट गोष्टींचा नाश होतो. गुढी पाडव्यानिमित्त तुम्ही आपल्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना संस्कृतमध्ये Messages, Greetings, Images, आणि WhatsApp Stickers च्या माध्यमातून शुभेच्छा देऊ शकता. मराठी नववर्षाचे स्वागत आणि शुभेच्छा देण्यासाठी तुम्हाला खालील ईमेज नक्की उपयोगात येतील. (वाचा - Happy Gudi Padwa 2021 Messages: गुढी पाडव्या निमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Images, WhatsApp Stickers शेअर करुन द्या नववर्षाच्या शुभेच्छा!)
ब्रह्मध्वज नमस्तेऽस्तु सर्वाभीष्टफलप्रद ।
प्राप्तेऽस्मिन् वत्सरे नित्यं मद्गृहे मङ्गलं कुरु ॥

सूर्य संवेदना पुष्पे:, दीप्ति कारुण्यगंधने।
लब्ध्वा शुभम् नववर्षेअस्मिन् कुर्यात्सर्वस्य मंगलम् ॥

सर्वस्तरतु दुर्गाणि सर्वो भद्राणि पश्यतु ।
सर्वः कामानवाप्नोतु सर्वः सर्वत्र नन्दतु ॥

नववर्षं नवचैतन्यं ददातु ।

गुढी पाडव्याचा सण महाराष्ट्रात अत्यंत उत्सवात साजरा केला जातो. या दिवसापासून मराठी नववर्षाची सुरुवात होते. या दिवशी लोक घर स्वच्छ करून रांगोळी काढतात आणि विजयाची गुढी उभारतात. गुढी पाडव्याच्या सणानिमित्त मराठी लोक पूरण पोळी बनवतात. गुढी उभारल्याने घरात सुख आणि समृद्धी वाढते आणि नकारात्मक गोष्टी घरापासून दूर राहतात. असं म्हटलं जात की, या दिवशी भगवान राम रावणाला नष्ट करून आपल्या जन्मभूमी अयोध्येत परत आला होता.