Gudi Padwa 2019: गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त कधी? हा सण साजरा करण्याचे महत्व जाणून घ्या
Gudi Padwa (Photo Credits-File Image)

Gudi Padwa 2019: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. हिंदू धर्मियांच्या वर्षाची सुरुवात या दिवशी सुरु होते.पाडव्याच्या दिवशी घरात गोडाधोडाच्या पदार्थासह घरात गुढी उभारुन त्याची पूजा केली जाते. प्रथेनुसार पाडव्याच्या दिवशी दृष्ट प्रवृत्तींच्या राक्षसाचा वध करुन श्रीराम अयोध्येत परत आल्याचा दिवस म्हणजेच गुढीपाडवा.

हिंदू धर्मात पाडव्याच्या सणाबद्दल अनेक रुढी आणि परंपरा आहेत. गुढीमधील ध्वजाचा अर्थ झंड आणि पाडव्याला प्रतिपदा तिथीच्या रुपाने साजरा केला जातो. पाडव्याबद्दल लोक कथांनुसार या दिवशी भगवान ब्रम्हा यांनी सृष्टीची निर्मिती केली असल्याचे मानले जाते.शुभ मुहूर्त प्रतिपदा तिथी प्रारंभ 5 एप्रिल 2019 ला 11.50 असून त्याची समाप्ती 6 एप्रिल 2019 ला 12.53 मिनिटांनी होणार आहे.(हेही वाचा-Gudi Padwa 2019 Shobha Yatra: पुणे,नाशिक,कोल्हापूर सह मुंबईमध्ये यंदा कुठे निघणार गुढीपाडवा शोभायात्रा,स्वागतयात्रा?)

दक्षिण भारतामधील आंध्र प्रदेशात, कर्नाटक आणि महाराष्ट्रात पाडव्याचा सण अतिउत्साहात साजरा केला जातो. उत्तम धान्य आणि घरात सुखसमृद्धी नांदण्यासाठी या दिवसाला फार महत्व दिले जाते. तसेच पाडव्याला पुरण पोळीचा नैवेद्य खास मानला जातो.