Independence Day 2022 Google Doodle | (Photo Credit: Google)

भारतीय स्वातंत्र्यास आज 75 वर्षे पूर्ण होत आहे. त्यामुळे स्वतंत्र भारताचे यंदा अमृतमहोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त देशभरात उत्साह आहे. इंटरनेट जगतातील सर्वात मोठे सर्च इंजिन गूगलही डूडल (Independence Day 2022 Google Doodle) बनवून भारतीय स्वातंत्र्य दिनाचा उत्साह (Indian Independence Day Celebration) साजरा करत आहे. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त गूगल डूडल इंटरनेटवर येणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेते आहे. आजच्या गूगल डूडलमध्ये (Google Doodle) रंगीबेरंगी पंतग दाखविण्यात आले आहे. हे पतंग भारताने गाठलेली उंची दर्शवत आहेत. हे डूडल केरळमधील कलाकार नीतिने यार केले आहे. ज्यात भारताला 15 ऑगस्टला मिळालेल्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याचा उत्साह साजरा करताना दाखविण्यात आले आहे.

गूगल डूडल मध्ये स्वातंत्र्य दिन 2022 मध्ये पतंगांच्या माध्यमांतून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले आहे. पतंगांसोबत गूगलचे हे डूडल 75 वर्षांमध्ये भारताने गाठलेल्या विविध क्षेत्रातील नव्या उंचिचे प्रतीक मानले जाते आहे. जीआयएफ एनीमेशन डूडलला आणखीच जीवंत आणि लक्ष्यवेधी बनवताना दिसते. डूडलबद्दल आपले विचार सामायिक करत नीतिने म्हटले आहे की, आमच्या सर्वात सुंदर आठवणी पतंगांच्या माध्यमातून दर्शविण्यात आली आहे. ज्यात भारताची सर्वात प्राचिन संस्कृती पाहायला मिळते. स्वातंत्र्याच्या चळवळीत स्वत:ला झोकून देणाऱ्या क्रांतिकारकांनी त्या वेळी पतंगांच्या माध्यमातूनही इंग्रजांविरुद्ध घोषणा देण्यासाठी पतंगाचा वापर केला होता. (हेही वाचा, Happy Independence Day 2022 HD Images: भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन साजरा करा 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव')

आज तोच दिवस आहे ज्या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले. होय, तोच दिवस. 15 ऑगस्ट. 1947 सालच्या 15 ऑगस्ट या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले. जगाच्या नकाशावर एक स्वतंत्र राष्ट्र अस्तित्वात आले. जुलमी इंग्रजी राजवटीतून भारताची मुक्तता झाली आणि भारतातील नागरिक खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला. भारताला स्वातंत्र्य मिळवत असताना अनेक महापुरुषांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. या बलिदानाचे सार्थक झाले. 15 ऑगस्ट 1947 रोजी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर पहिल्यांदा भारताचा राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात आला.