
येशू ख्रिस्ताला मानणार्या ख्रिस्ती बांधवांसाठी गुड फ्रायडे (Good Friday) हा एक महत्वाचा दिवस आहे. ख्रिस्ती धर्मियांच्या मान्यतांनुसार गुड फ्रायडे दिवसी येशू ख्रिस्त सूळावर चढला होता आणि त्याने आपलं बलिदान दिले. गुड फ्रायडे हा ब्लॅक फ्रायडे (Black Friday) किंवा दुखवट्याच्या दिवसाप्रमाणे पाळला जातो. यंदा हा गुड फ्रायडे 15 एप्रिल दिवशी आहे. या दिवसानिमित्त ख्रिश्चन धर्मीय चर्चमध्ये जाऊन प्रभू प्रति आपली कृतज्ञता अर्पण करतात. यावेळेस काही जण काळे कपडे देखील परिधान करतात. भारतामध्ये अनेक ठिकाणी हा दिवस सार्वजनिक सुट्टीचा दिवस असतो. मग या दिवशी प्रभूच्या बलिदानाप्रति तुम्हांलाही आपली कृतज्ञता व्यक्त करायची असल्यास सोशल मीडीयामध्ये Facebook, WhatsApp Status वर गूड फ्रायडे निमित्त काही फोटोज, वॉलपेपर, HD Images शेअर करून तुम्ही या दिवशी येशू ख्रिस्ताच्या बलिदानाचा दिवस स्मरण करू शकता.
मानवजातीसाठी प्रभू येशू यांचं बलिदान विशेष मानलं जातं. या बलिदानाच्या स्मरणार्थ चर्च मध्ये 3 वाजता प्रार्थना केली जाते. भारताप्रमाणेच स्पेन, इटली, फिलिपाईन्स मध्ये यात्रा काढून येशूच्या बलिदानाचा हा दिवस पाळला जातो.
गुड फ्रायडे इमेजेस




जगभरात गुड फ्रायडे हा दिवस होली डे, ग्रेट फ्रायडे किंवा ब्लॅक डे या नावाने देखील ओळखला जातो. गुड फ्रायडे हा चांगुलपणाचा दिवस असल्याने या दिवसाचं औचित्य साधत अनेकजण समाज उपयोगी कामांमध्ये स्वतःला गुंतवून घेतात. या दिवशी वृक्षारोपण, दान धर्म करून गुड फ्रायडे सत्कारणी लावला जातो.