
Goa Liberation Day 2024 HD Images in Marathi: आज गोवा मुक्ती दिन साजरा होत आहे. याच दिवशी 1961 साली गोव्याला पोर्तुगीज सैन्यापासून स्वातंत्र्य मिळाले. चिवट संघर्षानंतर भारताला ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले, पण त्यानंतरही गोवा 14 वर्षे पोर्तुगीजांचा गुलाम राहिला. पोर्तुगीजांनी गोव्यावर 450 वर्षे राज्य केले. देश स्वतंत्र झाल्यानंतर 14 वर्षांनी लोकांनी गोवाही मुक्त करण्याचा संकल्प केला होता आणि अवघ्या 36 तासांत पोर्तुगीज सैनिकांनी भारतापुढे शरणागती पत्करली. 19 डिसेंबर 1961 रोजी झालेल्या स्वाक्षरीनंतर गोव्यावरील पोर्तुगीज राजवट संपली आणि तेव्हापासून दरवर्षी 19 डिसेंबर रोजी गोवा मुक्ती दिन साजरा केला जातो.
भारतीय जवानांनी आपल्या धैर्याच्या आणि एकतेच्या जोरावर अवघ्या काही तासांत गोवा मुक्त केला. पोर्तुगीजांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गोव्यात निवडणुका झाल्या आणि 20 डिसेंबर 1962 रोजी दयानंद भांडारकर हे गोव्याचे पहिले निवडून आलेले मुख्यमंत्री बनले. तर या गोवा मुक्ती दिनानिमित्त खास WhatsApp Status, Images, Wallpapers, Messages शेअर करून द्या शुभेच्छा.





पोर्तुगीजांनी गोवा सोडण्यास दिला नकार-
वास्को द गामा 1498 मध्ये भारतात आला आणि त्यानंतर काही वर्षांत पोर्तुगीजांनी हळूहळू गोवा काबीज केला. 1510 पर्यंत पोर्तुगीजांनी भारतातील अनेक भाग काबीज केले होते, परंतु 19व्या शतकापर्यंत पोर्तुगीज वसाहत गोवा, दमण, दादर, दीव आणि नगर हवेलीपर्यंत मर्यादित राहिली. भयंकर जातीय हिंसाचार आणि फाळणीनंतर 1947 मध्ये भारताला ब्रिटीशांकडून पूर्ण स्वातंत्र्य मिळाले, परंतु पोर्तुगीजांनी गोवा आणि देशाच्या इतर कोणत्याही भागावरील त्यांचे शासन संपविण्यास नकार दिला. सुरुवातीच्या काळात भारत सरकारने शांततेच्या माध्यमातून पोर्तुगीजांपासून सुटका करण्याचा प्रयत्न केला, परंतु सर्व प्रयत्न अयशस्वी होताना दिसत होते. (हेही वाचा: Anganewadi Jatra 2025 Date: आंगणेवाडी भराडी देवीची जत्रा यंदा 22 फेब्रुवारी दिवशी)
भारत सरकारने सुरु केले ‘ऑपरेशन विजय’-
यानंतर, भारत सरकारने 1955 मध्ये गोव्यावर आर्थिक निर्बंध लादले, ज्यामुळे पोर्तुगीज शरणागती पत्करतील, परंतु हा प्रयत्न देखील अयशस्वी झाला, कारण भारतातील अनेक मुख्य किनारे पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. सर्व राजनैतिक प्रयत्न अयशस्वी झाल्यावर पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी गोवा मुक्त करण्यासाठी लष्करी बळाचा वापर करण्याचा निर्णय घेतला. गोवा मुक्त करण्यसाठी 17 डिसेंबर रोजी ऑपरेशन विजय सुरू करण्यात आले. या मोहिमेअंतर्गत नौदल, लष्कर आणि हवाई दलाचे 30 हजार सैनिक तैनात करण्यात आले होते.
पोर्तुगीजांनी 36 तासांत पत्करली हार-
अखेर भारतीय सैन्यापुढे टिकाव न लागल्याने अवघ्या 36 तासांत 19 डिसेंबर रोजी तत्कालीन पोर्तुगीज गव्हर्नर मेन्यू वासालो डी सिल्वा यांनी भारताला आत्मसमर्पण करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली. यानंतर गोवा पूर्णपणे भारतात सामील झाला आणि दमण-दीवलाही स्वातंत्र्य मिळाले. यानंतर, 30 मे 1987 रोजी, गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला आणि गोवा अधिकृतपणे भारताचे 25 वे राज्य बनले.