
Krishna Janmashtami 2023 Messages:भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पौराणिक मान्यतेनुसार द्वापार युगात या तिथीला मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. भगवान श्रीकृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रात होत असल्याने जन्माष्टमीला रोहिणी नक्षत्र आणि अष्टमी तिथीचा विशेष विचार केला जातो. पंचांगानुसार यावर्षी रोहिणी नक्षत्र आणि अष्टमी तिथीमुळे जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्ताबाबत संभ्रम आहे.
द्रिक पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील अष्टमी तिथी 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3:37 पासून सुरू होईल. तसेच, ही तारीख 7 सप्टेंबर रोजी दुपारी 4:14 वाजता संपेल. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त Wishes, Quotes, Images, Greetings, Whatsapp Status द्वारे तुम्ही आपल्या मित्र-परिवारास खास शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा - Krishna Janmashtami 2023 Date: श्रीकृष्ण जन्माष्टमी कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी)
कृष्ण ज्याचं नाव
गोकुळ ज्याचं धाम
अशा श्री भगवान कृष्णाला
आमचा शतश: प्रणाम
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

गोकुळामध्ये होता ज्याचा वास
गोपिकांसोबत ज्याने रचला रास
यशोदा, देवकी ज्याची मैय्या
तोच साऱ्यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्या
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

दह्यात साखर आणि, साखरेत भात,
दही हंडी उभी करूया,
देऊया एकमेकांना साथ,
फोडूया हंडी लावूनच उंच थर,
जोशात करूया दही हंडीचा थाट…
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !

राधा ची भक्ति, बासुरी ची गोडी
लोणी चा स्वाद आणि,गोपीं चा रास
सर्व मिळून साजरा करू
गोकुळाष्टमी चा दिवस खास.
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा…!

चंदनाचा सुवास,फुलांची बरसात,
दह्याची हंडी आणि पावसाची बरसात,
लोणी चोरायला आला माखनलाल,
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

कंसाचा नाश करण्यासाठी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला मध्यरात्री श्रीकृष्णाने मथुरेत अवतार घेतला. या दिवशी भगवान स्वतः पृथ्वीवर अवतरले असल्याने हा दिवस कृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो. म्हणूनच श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने मथुरा नगरी भक्तीच्या रंगांनी रंगून जाते.