
Ashadhi Ekadashi 2024 Messages In Marathi: प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला एकादशीचे व्रत पाळले जाते. या दिवशी दिवसभर उपवासही केला जातो. एकादशीचे व्रत केल्याने मागील जन्मातील सर्व पापे नष्ट होतात, असे मानले जाते. आषाढ महिन्यातील देवशयनी एकादशीचे (Devshayani Ekadashi 2024) व्रत विशेष मानले जाते. या एकादशीला देवशयनी एकादशी, पद्मनाभ एकादशी, हरिशयनी एकादशी किंवा आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2024) असेही म्हटले जाते. आषाढ महिन्यातील एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी योगनिद्राला म्हणजेच झोपेत जातात आणि नंतर कार्तिक महिन्यातील देवूठाणी एकादशीच्या दिवशी जागे होतात.
पंचांगानुसार, आषाढ महिन्यातील एकादशी किंवा देवशयनी एकादशी तिथी मंगळवार, 16 जुलै रोजी रात्री 8:33 वाजता सुरू होईल आणि बुधवार, 17 जुलै रोजी रात्री 09:02 वाजता समाप्त होईल. उदयतिथीनुसार या वर्षी देवशयनी एकादशीचे व्रत 17 जुलै रोजी होणार आहे. आषाढी एकादशी निमित्त Whatsapp Status, Wishes, Images, Greetings द्वारे तुम्ही विठ्ठलभक्तांना खास मराठमोळ्या शुभेच्छा देऊ शकता.
सोहळा जमला आषाढी वारीचा,
सण आला पंढरीचा, मेळा जमला भक्तगणांचा
ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!

चैतन्याचा गाभा… विटेवर उभा
पालख्यांचा सोहळा नाही.. वारकऱ्यांचा मेळा नाही
मागतो मी पांडुरंगा फक्त एकदान
मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे दान..
पंढरीनिवासा सख्या पांडुरंगा
रखूमाईवर उभा विटेवर..
कर कटेवर ठेऊनिया भगवंता,
तव तेज ह्या तिमिरात दे आता”
आषाढी एकादशीनिमित्त शुभेच्छा…!

देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई,
सुखालाही आला या हो आनंदाचा पूर,
चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर,
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा …!

जगण्याचं बळ देणारी
विठ्ठला तुझी वारी
यंदा भेट नाही पांडुरंगा
चंद्र भागेच्या तीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी,
विठ्ठल विठ्ठल जय हरी..!
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा ….

तुझा रे आधार मला, तूच रे पाठीराखा,
तूच रे माझ्या पांडुरंगा, चुका माझ्या देवा,
घे रे तुझ्या पोटी, तुझे नाम ओठी सदा राहो,
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा ..!

देवशयनी एकादशीचा दिवस हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवसापासून जैन धर्मातील लोकांचा चातुर्मास किंवा चौमासही सुरू होतो, म्हणजेच या दिवसापासून साधूसंतही चार महिने प्रवास करत नाहीत, तर एकाच ठिकाणी राहून देवाची पूजा करतात.