Buddha Purnima 2024 Messages In Marathi: बुद्ध पौर्णिमानिमित्त Greetings, SMS, Wishes, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून द्या खास शुभेच्छा!
Buddha Purnima 2024 Messages (PC - File Image)

Buddha Purnima 2024 Messages In Marathi: बौद्ध धर्मात बुद्ध पौर्णिमेला (Buddha Purnima 2024) विशेष महत्त्व आहे. या तिथीचा भगवान बुद्धांच्या जीवनाशी खोल संबंध आहे. या तारखेला गौतम बुद्धांचा जन्म झाला आणि वैशाख पौर्णिमेलाच कुशीनगर येथे त्यांचा मृत्यू झाला. बोधगया येथे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले. ही तिथी भगवान बुद्धांच्या जीवन, मृत्यू आणि ज्ञानप्राप्तीशी संबंधित आहे. यावर्षी वैशाख पौर्णिमा 23 मे रोजी आहे.

बौद्ध धर्मग्रंथानुसार भगवान बुद्धांचा जन्म वैशाख पौर्णिमा तिथीला झाला होता. त्यामुळे यंदा 23 मे रोजी बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. बुद्ध पौर्णिमानिमित्त Buddha Purnima Messages, Buddha Purnima Wishes, Buddha Purnima Wallpapers, Buddha Purnima WhatsApp Status शेअर करून तुम्ही आपल्या मित्र-परिवारास बुद्ध जयंतीच्या मराठमोळ्या शुभेच्छा देऊ शकता.

बुद्ध पौर्णिमा या मंगलमय दिवसाच्या

हार्दिक शुभेच्छा! हा खास दिवस

तुमच्या आयुष्यात सुख, शांती घेऊन येवो

हीच कामना!

Buddha Purnima 2024 Messages (PC - File Image)

क्रोधाला प्रेमाने,

पापाला सदाचारने,

लोभाला दानाने आणि

असत्याला सत्याने जिंकता येते..

बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Buddha Purnima 2024 Messages (PC - File Image)

बुद्ध पौर्णिमेचा हा चंद्र

तुमच्या आयुष्यातले दु:ख दूर करून

सुख शांती आणि समाधान घेऊन येवो हीच आमची कामना..

Buddha Purnima 2024 Messages (PC - File Image)

अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणार्‍या

दया, क्षमा, शांतीची शिकवण देणार्‍या

गौतम बुद्धांना विनम्र अभिवादन!!

Buddha Purnima 2024 Messages (PC - File Image)

भगवान बुद्धांच्या शिकवणी तुम्हाला बुद्धी,

करुणा आणि आंतरिक शांतीच्या मार्गावर मार्गदर्शन करतील!

बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा!

Buddha Purnima 2024 Messages (PC - File Image)

बुद्धं शरणं गच्छामि,

धम्मं शरणं गच्छामि,

संघं शरणं गच्छामि

बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

Buddha Purnima 2024 Messages (PC - File Image)

बुद्ध पौर्णिमेला शिवयोग 24 मे रोजी दुपारी 12:12 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 11:22 पर्यंत सुरू आहे. साधक शिवयोगात स्नान आणि ध्यान करून जगाचा पालनपोषण करणाऱ्या भगवान विष्णूची उपासना करू शकतात. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योगाचाही योगायोग आहे.