
Diwali Padwa 2022 Wishes: कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा म्हणून साजरा करतात. यंदा हा दिवस 26 ऑक्टोबरला साजरा होणार आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त असे या दिवसाचे वर्णन केले जाते. दिवाळी पाडव्या निमित्त पत्नी आपल्या पतीला ओवाळते आणि त्या बद्दल्यात पती पत्नीला छानसं गिफ्ट देतो. नवविवाहित दांपत्यासाठी दिवाळी पाडवा खूपचं खास असतो. याशिवाय कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा सण साजरा केला जातो. या दिवशी बळी राजाचे चित्र काढतात आणि त्याची पूजा करतात. तसेच 'इडा पिडा तळो आणि बळीचे राज्य येवो' असं म्हणतात.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. तसेच व्यापारी या दिवसापासून आर्थिक लेखा लिहून ठेवण्याचा दिवाळी पाडव्याला नवीन वर्षाची सुरुवात मानतात. यानंतर लक्ष्मीची नवीन पुस्तकांची पूजा करून व्यापारी वर्षाची सुरुवात करतात. दिवाळी पाडवा सर्वांसाठीचं खास असतो. दिवाळी पाडव्यानिमित्त WhatsApp Status, SMS, HD Greetings, Quotes द्वारा द्या तुम्ही आपल्या पती-पत्नीस खास शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्हाला खालील ईमेज फ्रीमध्ये डाऊनलोड करता येतील.
कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा,
दिवाळीचा पाडवा आणतो नात्यात गोडवा,
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना
दिवाळी पाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

तुम्ही माझ्यासाठी जगातील सुंदर गिफ्ट आहात
या शुभदिनी तुम्हाला उत्तम आरोग्य,
आयुष्य लाभो हीच सदिच्छा!
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

पणतीचा उजेड अंगणभर राहू दे,
लक्ष्मीचा वास घरोघर राहू दे
माझ्यासाठी जिथे तू तिथेच आहे घर,
तुझा सहवास जन्मभर राहू दे
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

वर्षामागून वर्ष जाती,
बेत मनीचे तसेच राहती
पण तुझी साथ कधी न सुटती,
हीच इच्छा कायमस्वरूपी मनी
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

सुमुहूर्तावरी पाडव्याच्या एकात्मतेचे लेणे लेऊया
भिन्नविभिन्न असलो तरीही कायम एकत्रच राहूया
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी दिवाळी पाडवा साजरा केला जातो. पती-पत्नीमधील प्रेम आणखी वाढावे यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी पत्नी आपल्या पतीचे औक्षण करते. याशिवाय पती आपल्या पत्नीला दिवाळी पाडव्यानिमित्त खास गिफ्ट देतो.