
Kojagiri Purnima 2025 Images: शरद ऋतूमधील अश्विन महिन्याची पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा (Kojagiri Purnima) म्हणून साजरी केली जाते. ही पौर्णिमा शरद पौर्णिमा किंवा कौमुदिनी पौर्णिमा म्हणून देखील ओळखली जाते. यंदा ही कोजागरी पौर्णिमा सोमवारी 06 ऑक्टोबर दिवशी साजरी केली जाणार आहे. कोजागिरी पौर्णिमेची रात्र जागवण्याची प्रथा आहे. या रात्री लक्ष्मी माता पृथ्वीवर संचार करते अशी हिंदू धर्मीयांची धारणा आहे. हे देखील वाचा: Kojagiri Purnima 2025 Ukhane: कोजागिरी पौर्णिमानिमित्त नववधूंसाठी खास उखाणे, पतीचे नाव घ्या आणि सणाचा आनंद वाढवा मनाने)
चंद्राच्या शीतल प्रकाशात दूध आटवून मसाले दुध पिण्याचा आनंद अनेकजण जण लुटतात. मग तुमच्या प्रियजणांना आज किमान सोशल मीडीयात शुभेच्छापत्र शेअर करत या दिवसाचा आनंद नक्कीच द्विगुणित करू शकाल. मग या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तुमच्या नातेवाईक, मित्रमंडळी, प्रियजणांना WhatsApp, Facebook, Instagram, X च्या माध्यमातून खास मेसेजेस, Quotes, Wishes, Greetings द्वारा शेयर करा.
कोजागिरी म्हणजे जागरूकता वैभव,
उल्हासाचा आणि आणि आनंदाचा उत्सव,
शितलता आणि सुंदरता यांच्या शांतीरूप समन्वयाची अनुभूती...
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रत्येकाचा जोडीदार, त्याचा चांदोबा असतो,
परिस्थितीनुसार ससा आणि कधी कधी वाघोबा होतो,
निराशेचे ढग हटवून, झाले गेले विसरून जाऊ,
आजच्या रात्री शुभ्र चांदण्यात, एकमेकांचे होऊन जाऊ...
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा !
मंद प्रकाश चंद्राचा,
त्यात गोडवा दुधाचा,
विश्वास वाढू दे नात्याचा,
त्यात असू दे गोडवा साखरेचा...
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
दूध हे केशरी, कोजागिरीचे खास,
वेलची-बदाम अन पिस्ते घातले आहेत त्यात,
परमेश्वराकडे प्रार्थना आपल्या नात्यात
असाच वाढावा गोडवा आणि
आयुष्यभर मिळावी एकमेकांची साथ...
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
शरदाचे चांदणे आणि कोजागिरीची रात्र,
चंद्राच्या मंद प्रकाशात साजरी करू एकत्र,
दूध साखरेचा गोडवा नात्यामध्ये येऊ दे,
आनंदाची उधळण आपल्या जीवनी होऊ दे...
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
कोजागिरीची रात्र ही गाणी गात, खेळ खेळत जागवली जाते. यामध्ये चंद्राच्या प्रकाशातच दूध आटवून त्याची खीर किंवा मसाले दूध केले जाते. नंतर प्रसाद म्हणून ते पिण्याची पद्धत आहे. या कोजागरीच्या रात्रीचं चांदणं हे खास असतं. यामध्ये विशेष अमृतमयी गुण असतात अशी धारणा असल्याने या रात्री सारे एकत्र जमतात.