
महाराष्ट्रामध्ये आज (10 सप्टेंबर) पासून गणेशोत्सवाची (Ganeshotsav) धूम सुरू झाली आहे. पण यंदा कोरोना चे सावट पाहता आणि आगामी तिसरी लाट रोखण्यासाठी हा सण अत्यंत साधेपणाने, अनावश्यक गर्दी टाळत तसेच सुरक्षित वातावरणामध्ये साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकार कडून करण्यात आले आहे. म्हणूनच तुमच्या घरी देखील आज श्रींचं आगमन झालं असेल तर तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना त्याच्या दर्शनाचं आमंत्रण देताना थोडं थांबा. यावर्षी देखील विनाकारण प्रवास टाळण्याचा मोह टाळा आणि बाप्पाचं दर्शन ऑनलाईन घ्या. मग तुमच्या प्रियजणांना हे ऑनलाईन दर्शन उपलब्ध करुन देण्यासाठी व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल, गूगल मीट, स्काईप, झूम कॉल असे अनेक पर्याय आहेत. त्याच्या विशिष्ट वेळातील लिंक्स तुम्ही शेअर करू शकता. तसेच आरतीच्या वेळी देखील कुटुंबातील सारे ऑनलाईन दर्शन घेऊ शकता. मग या सार्यांची माहिती देत यंदा आमंत्रण पत्रिका, निमंत्रणं कशी बनवाल? हा प्रश्न तुम्हांला पडला असेल तर आम्ही केलेले हे 'गणेशोत्सव 2021 आमंत्रण पत्रिका' नमूने तुम्हांला नक्कीच मदत करू शकतील.
दरम्यान यंदा सार्वजनिक मंडळांमध्येही गणेशभक्तांना बाप्पाच्या दर्शनासाठी जाता येणार नाही. तेथे देखील सार्वजनिक मंडळांना भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची सोय खुली करून द्यावी लागणार आहे. मंडळात पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यासही बंदी आहे. (नक्की वाचा: Ganeshotsav 2021 Dates: हरतालिका, ज्येष्ठा गौरी पूजन ते अनंत चतुर्दशी यंदा गणेशोत्सवात पहा महत्त्वाच्या दिवसांच्या तारखा!).
गणपती दर्शन ऑनलाईन दर्शन आमंत्रण नमुने
नमुना 1:
आले रे आले बाप्पा आले...
यंदा देखील आमच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे. आपण श्रींचं दर्शन ऑनलाईन माध्यमातून घ्यावं ही विनम्र विनंती!
ऑनदर्शन लिंक-
नमुना 2:
गणपती बाप्पा मोरया
दरवर्षी प्रमाणे यंदाही 10 सप्टेंबर दिवशी आमच्याकडे गणरायाचं तर 12 सप्टेंबर दिवशी गौराईचं आगमन होणार आहे. तरीही आपण ऑनलाईन माध्यमातून बाप्पाचा आणि गौराईचा आशिर्वाद घ्यावा ही विनंती!
वेळ-
नमुना 3:
सालाबादाप्रमाणे यंदाही आमच्याकडे श्रीगणराय आणि गौराईचे आगमन होणार आहे. तरी यंदा बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी खाली दिलेल्या ऑनलाईन लिंकवर भेट द्यावी ही नम्र विनंती!
गणरायाची प्राणप्रतिष्ठा - 10 सप्टेंबर, सकाळी 9 पासून
गौराई पूजन - 13 सप्टेंबर, सकाळी 11.30 पासून
ऑनलाईन लिंक -
नमुना 4:

आज गणेश चतुर्थी पासून रविवार 19 सप्टेंबर 2021 अनंत चतुर्दशी असे दहा दिवस गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. यामध्ये सोमवारी 13 सप्टेंबर दिवशी गौराई अर्थात पार्वतीचं देखील पूजन होणार आहे. मग यंदा गौरी गणपतीची आमंत्रण ऑनलाईन देत कोरोनाचं विघ्न दूर सारायला प्रशासनाला मदत करा.