Easy Chicken Recipes Gatari Special: श्रावणाची महिना सुरु होण्याची चाहूल देण्यासाठी येणारी 'गटारी अमावस्या' (Gatari Amavasya) अलीकडच्या काळात खूपच महत्त्वाची आणि चर्चेचा विषय बनत चालली आहे. कारण या दिवशी श्रावण पाळणारे लोक मांसाहारावर ताव मारतात. चिकन, मटण, मासे यांपासून विविध मेन्यूची जणू पाककृती या दिवशी प्रत्येक घरात पाहायला मिळते. हा दिवस म्हणजे या दिवसानंतर मांसाहार मिळणार या भावनेनेच मांसाहार प्रेमी (Non-Veg) या जेवणावर तुटून पडतात. कोंबडी वडे हा यातला सर्रासपणे केला जाणारा लोकप्रिय पदार्थ. पण यासोबत तुम्हाला आणखीन चमचमीत आणि झणझणीत चिकनच्या रेसिपीज ट्राय करायच्या असतील तर हा लेख तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल.
चिकन रस्सा सह चिकन पासून बनवलेले असेही पदार्थ आहेत जे खूपच झणझणीत आणि चटकदार आहेत. त्यामुळे तुम्हाला नेहमीपेक्षा काही हटके चिकन मेन्यू ट्राय कराचे असतील तर पाहा 'हे' व्हिडिओज:
चिकन खर्डावाला
ढाबा स्टाईल चिकन मसाला
चिकन खिमा पाव
चिकन सुका
कोंबडी-वडे
काय मग या झणझणीत रेसिपीज पाहून तोंडातून लाळ टपकली असेल आणि कधी एकदा या रेसिपीज बनवतो असे झाले असेल. गटारी अमावस्येचा हा दिवस लज्जदार, मसालेदार बनविण्यासाठी या हटके रेसिपीज यंदा नक्की ट्राय करा.