Gatari 2020 Special Fish Recipes: गटारी निमित्त खेकड्यांचे कालवण ते कोलंबी भातापर्यंत घरच्या घरी बनवा 'या' लज्जतदार मासळी रेसिपीज; Watch Videos
Gatari Special Fish Recipes (Photo Credits: YouTube)

Easy Fish Recipes Gatari Special: श्रावण महिना सुरु व्हायला आता काहीच दिवस उरले आहेत. या महिन्याची सुरुवात होण्याआधी येते ती 'आषाढी अमावस्या' (Ashadhi Amavasya) ज्याला अलीकडे 'गटारी अमावस्या' (Gatari Amavasya) संबोधून या दिवशी मांसाहारी जेवणावर मनसोक्त ताव मारण्याचा जणू फॅडच झाले आहे. ही गटारी दणक्यात साजरी करण्यासाठी प्रत्येक घरात जेवणाचे बेत वा मेन्यूची यादी तयार होत असेल. दरवर्षी प्रमाणे यंदाही ती दणक्यातच साजरी होईल यात वाद नाही, पण त्याआधी लॉकडाऊनच्या सूचना पाळून ती साजरी करावी हे थोडे ध्यानात ठेवा म्हणजे झालं. या दिवशी जर तुम्ही माशांची (Fish) खास आणि हटके रेसिपीज बनवू इच्छिता तर तुमच्यासाठी हा लेख नक्कीच फायदेशीर ठरेल.

तसे आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या रेसिपीज आणि ती करण्याची पद्धत देखील वेगळी आहे. त्यामुळे जर आपल्या रोजच्या माशांच्या रेसिपीज (Fish Recipes) पेक्षा काही हटके गोष्टी ट्राय करायच्या असतील तर पुढील दिलेले व्हिडिओज नक्की पाहा

भरलेले पापलेट

हेदेखील वाचा- Gatari 2020: श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी मांसाहारावर ताव मारण्यासाठी 'गटारी' सेलिब्रेशन करिता 19 जुलै शेवटचा रविवार!

जवल्याची भजी

खेकड्याचे कालवण

कोलंबी भात

बांगडा फ्राय

काय मग! या रेसिपीज बघून तोंडाला पाणी सुटलं असेल आणि कदाचित तुमच्या मेन्यूच्या यादीत बदलही झाला असेल. तसे मासे प्रेमींसाठी माशांची कुठलीही डिश ही चविष्टच लागते. मात्र तरीही गटारीची घरात राहून छान घरगुती जेवणावर ताव मारायचा असेल तर या रेसिपीज ट्राय करायला काही हरकत नाही.