Ganesh Chaturthi 2019 Invitation Marathi Messages Format: यंदाचा गणेशोत्सव (Ganeshotsav) महाराष्ट्रासह जगभरात 2 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर दरम्यान साजरा होणार आहे. गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) दिवशी गणपती बाप्पाचं आगमन सार्वजनिक मंडळांसह अनेक घरांमध्येही होणार आहे. घरगुती गणेशोत्सव किमान दीड दिवस ते 5, 7, 10 दिवस साजरा केला जातो. काही घरात गणपतींसोबतच गौरी आवाहनाचादेखील सोहळा रंगतो. मग यंदा या सेलिब्रेशनमध्ये तुमच्या मित्रमंडळांसोबत, घरातील नातेवाईकांना, सहकार्यांना आमंत्रित करण्यासाठी आकर्षक आमंत्रण पत्रिका बनवून निमंत्रित करण्यासाठी ही काही नमुना पत्रिका शेअर करून यंदाचं आमंत्रण अधिक आकर्षक बनवू शकता. Ganpati Invitation 2020 Marathi Messages Format: बाप्पाच्या दर्शनाला सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत निमंत्रण देण्यासाठी खास आमंत्रण पत्रिका
आजकाल डिजिटल मीडिया आणि सोशल मीडियाचा बोलबाला असल्याने व्हॉट्सअॅप, फेसबुकच्या माध्यमातून आकर्षक आमंत्रण पत्रिका शेअर करून तुम्ही यंदाच्या गणेशोत्सवाचं आमंत्रण बनवू शकता. Ganesh Chaturthi 2019: गणरायाच्या स्वागतासाठी आणि पूजेसाठी लागणा-या साहित्याची करुन घ्या एकदा उजळणी, येथे पाहा साहित्याची संपुर्ण यादी
गणेशोत्सव 2019 आमंत्रण पत्रिका नमूना
नमुना 1 :
नमस्कार,
सालाबात प्रमाणे याही वर्षी आमच्या घरी दिनांक 2/9/2019 रोजी ... दिवस आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे.तसेच त्या निमित्त सत्यनारायणाची पूजा आयोजित केली आहे.तरी आपण सर्वानी सहकुटुंब सहपरिवार येऊन दर्शनाचा पूजेचे लाभ घ्यावा.
आपले नम्र
नमुना 2 :
ॐ श्री गणेशाय नम:॥
वर्षभरातून एकदा आमच्या घरी येणार्या गणरायाच्या या आनंद सोहळ्यात सहभागी होऊन बाप्पांचे आशिर्वाद घेण्यासाठी आपणास श्री आणि सौ यांसकङून आग्रहाचे निमंत्रण...
पत्ता—
तारीख,वेळ
कार्यक्रम नियोजन
सोमवार 2 सप्टेंबर 2019 , सकाळी 9 वाजता श्रींची प्राणप्रतिष्ठा
नमुना 3:
आम्हाला आपणास कळविण्यास आनंद होत आहे की यंदाही आमच्या घरी श्री गणेश चतुर्थीला सोमवार
दि.2/9/2019 ते शनिवार दि.7/9/2019 रोजी गणरायाचे आगमन होणार आहे तरी आपण आपल्या परिवारासह दर्शनाचा लाभ घ्यावा.
आपले नम्र,
ठिकाण :
नमुना 4:
नमस्कार मित्रांनो!!
काय मग? बाप्पाच्या आगमनाच्या तयारीत busy ना!...मोदक,आरास,आणि काय काय...
आरतीचं पुस्तक आणि सोमवार साठी लगबग
सगळीकडे असंच उत्साहाचं वातावरण... म्हणूनच
यंदाही आमच्याकडे बाप्पा उंदरावरून स्वार होऊन येणार आहे... काय म्हणताय किती दिवस ?
*दीड दिवस* हो!!
दिनांक 2 सप्टेंबर ते 3 सप्टेंबर...
या दिवसात पण मज्जा,उत्साह, धम्माल,आणि मोदकांचा आस्वाद बाप्पाबरोबर घेण्यासाठी येताय ना ?!
पत्ता?शोधलं की सापडतं
पत्ता-
नमुना 5:
*llश्री* *गणेशाय* *नम:ll*
सालाबादा प्रमाणे यंदाही "बाप्पा"चे 10 दिवसाचे वास्तव्य आमचे घरी दि. 2-9-2019 ते 12-9-2019 पर्यंत आहे. तरी या आनंदसोहळ्या प्रसंगी आपण आपल्या संपूर्ण परिवार व आपतेष्टां सोबत आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन व प्रसादाचा लाभ घेण्यासाठी जरुर यावे ही नम्र विनंती.
*-:पत्ता:-*
*आम्ही आपली वाट पाहत आहोत*
*-:नम्र* *विनंती:-*
श्री गणराय हे विद्येचे दैवत. तेव्हा त्यांच्या दर्शनाला येतांना फळे/मिठाई या स्वरूपी प्रसादाऐवजी 1 वही व पेन्सिल आणावी जेणेकरून आम्ही ती गरजू विद्यार्थ्यांना पोहोचवू.
गणेशोत्सव विशेष व्हिडिओ
यंदा गणेशोत्सव इको फ्रेंडली स्वरूपात साजरा करण्याकडे अनेक भाविकांचा भर आहे. त्यामुळे आमंत्रितांनाही त्याचे भान ठेवून गणपतीसाठी फळे, फुलं आणि इतर प्रसादाचे साहित्य आणण्याचे भान ठेवण्याचं आवाहन करायला विसरू नका. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये अनेक ठिकाणी गंभीर पूरस्थितीमुळे लाखो लोकं बेघर झाली आहेत. त्याचं भान ठेवूनही अनेक ठिकाणी एक गाव एक गणपतीची संकल्पना पुढे आली आहे.