Ganga Jayanti 2021 Wishes: सनातन धर्मात गंगा सप्तमीला विशेष महत्त्व आहे. शास्त्रानुसार, गंगा सप्तमीचा सण वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी साजरा केला जातो. यावर्षी हा उत्सव 18 मे मंगळवारी म्हणजेचं आज साजरा केला जात आहे. ज्या दिवशी माता गंगेचा जन्म झाला त्या दिवसाला गंगा सप्तमी म्हणून ओळखले जाते आणि ज्या दिवशी गंगा पृथ्वीवर उतरली त्या दिवसाला गंगा दशहरा म्हणतात. या शुभ दिवशी गंगा नदीत स्नान करून पूजा केली जाते. असे केल्याने रिद्धि-सिद्धि प्राप्त झाल्याने मनुष्यास सर्व पापांपासून मुक्तता मिळते. या बरोबरचं या दिवशी गंगासह भगवान विष्णूचीही पूजा केली जाते.
गंगा सप्तमीच्या दिवशी गंगा नदीत स्नान केल्यास सर्व पापं धुऊन जातात आणि माणसाला सर्व दु:खापासून मुक्ती मिळते. माता गंगाला मोक्षदायिनी असेही म्हणतात, म्हणून या दिवशी प्रार्थना केल्याने मनुष्याला मोक्ष देखील प्राप्त होतो. हा दिवस माता गंगाच्या पुनर्जन्माचा दिवस म्हणूनही मानला जातो. गंगा सप्तमी निमित्त Messages, Images, Greetings, Quotes, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन हा मंगलमयी दिवस साजरा करा. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता.
गंगा सप्तमीच्या दिवशी गंगा स्नान करण्यास अतिशय महत्त्व आहे. परंतु कोरोना साथीच्या रोगामुळे आपण या दिवशी गंगाजल पाण्यात टाकून स्नान करू शकता.