Modak Recipes (Photo Credits: YouTube)

Ganesh Chaturthi Special Easy Modak Recipes: विद्येची देवता आणि 64 कलांचा अधिपती असलेल्या आपल्या लाडक्या गणरायाचे सर्वांनी दणक्यात स्वागत केले असेल याबाबत तिळमात्र शंका नाही. गणेश चतुर्थीनिमित्त (Ganesh Chaturthi 2020) काही दिवसांसाठी पाहुणा म्हणून आलेल्या श्रीगणेशाच्या (Ganesha) पाहुणचारामध्ये कोणतीही कसर राहू नये घरात छान गोडाधोडाचे, पंचपक्वान्नाचे बेत ठरत असतील. यात गणपतीचा आवडीचा पदार्थ 'मोदक' (Modak) हा सर्वात अग्रस्थानी असेल. उकडीचे मोदक गणपतीला फार आवडतात. मात्र यंदा उकडीच्या मोदकांसोबत नैवेद्य म्हणून तसेच प्रसाद म्हणून घरातल्यांना देण्यासाठी थोड्या वेगळ्या पद्धतीने मोदक बनविण्यास हरकत नाही.

सध्याच्या काळात पौष्टिक असे पंचखाद्य, ड्रायफ्रूट्स यांपासून बनविलेल्या मोदकांपासून बच्चे कपंनीला आवडतील असे ओरिओ बिस्किटपासून बनवलेले, पनीर पासून बनवलेले मोदकही तुम्ही ट्राय करु शकता. Ganesh Chaturthi 2020 Modak Recipes: गणेश चतुर्थी निमित्त डबलडेकरपासून फुलांच्या पाकळ्यांच्या आकाराचे उकडीचे मोदक यंदा नक्की ट्राय करा

पाहा रेसिपीज:

ड्रायफ्रूट्स मोदक

ओरिओ बिस्किट मोदक

पनीर मोदक

पंचखाद्य मोदक

पान गुलकंद मोदक

या रेसिपीज पाहून तोंडाला पाणी असेल. गणपती बाप्पांसोबत घरातील मंडळीही या मोदकांवर छान ताव मारतील. त्यामुळे उकडीच्या मोदकांसोबतच थोडं वेगळेपण म्हणून तुम्ही हे हटके आणि अगदी सोप्प्या पद्धतीने बनवलेले मोदक घरच्या घरी तुम्ही नक्की ट्राय करु शकता.