
गणेशोत्सवाच्या सणाची लगभग सर्वत्र सुरु झाली आहे. मुंबई मधील बहुतांश नागरिक कोकणात जाण्यासाठी रेल्वे स्थानक, बस डेपो किंवा अन्य प्रवसाच्या मार्गांचा उपयोग करत कोकणात जातात. कारण कोकणातील गणशोत्सवाच्या सणाची मजा काही औरच असते असे बोलले जाते. परंतु गणपतीच्या ऐन वेळेस गावी जायचा बेत झाल्यास नागरिकांची प्रचंड गर्दी होते. तसेच रेल्वेचे तिकिट मिळणे सुद्धा मुश्किल होऊन जाते. त्यामुळे आता राज्य परिवहन मंडळाकडून गणेशोत्सवानिमित्त मुंबई (Mumbai) मधील कुर्ला (Kurla) बस डेपोमधून तब्बल 1080 जादा बस सोडण्यात येणार आहेत.
कोकणात जाण्यासाठी राज्यातील पुणे, नाशिक, औरंगाबाद या ठिकाणहून 950 एसटींचा ताफा मुंबईत दाखल झाला आहे. तर या सर्व एसटी बस चालकांच्या राहण्याची-जेवण्याची सोय कुर्ला बस डेपोमध्ये करण्यात येणार आहे.त्याचसोबत प्रवाशांची अल्कोहोल टेस्ट सुद्धा प्रवासापूर्वी घेण्यात येत आहे. तसेच रेल्वे प्रशासनाकडून ही नागरिकांना कोकणात जाण्यासाठी विशेष ट्रेनची सोय करुन देण्यात आली आहे.(मुंबई: LifeLine Express Hospital Train सीएसएमटी फलाट दहावर दाखल; रुग्णांवर कर्करोग, ईएनटी, प्लॅस्टिक सर्जरी उपचार उपलब्ध)
तर 30 ऑगस्टपासून दादर-मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस सावंतवाडी येथे थांबणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. कोकण रेल्वे मार्गावर 210 फेऱ्या होणार असून रेल्वे गाड्यांना 647 जादा डबेसुद्धा जोडण्यात येणार आहेत. यामुळे नागरिकांची कोकणात जाण्यासाठी होणारी गैरसोय होण्याचा त्रास कमी होणार आहे. परंतु रेल्वे तिकिटांबाबत अधिक कडक तपासणी करण्यात येणार असल्याची सुचना रेल्वे प्रशासनाने दिली आहे.