Ganesh Visarjan 2021 Messages: गौरी-गणपती विसर्जनाला आज बाप्पांना निरोप देताना प्रियजणांसोबत शेअर करा ही मराठमोळी ग्रीटींग्स, Quotes
Ganesh Visarjan| File Images

महाराष्ट्रामध्ये आज (14 सप्टेंबर) गौरी-गणपतीचं विसर्जन (Gauri Ganpati Visarjan) होणार आहे. बाप्पाचं आगमन त्यानंतर गौराई पूजन नंतर आज दोघेही पुढील वर्षभरासाठी भाविकांचा निरोप घेणार आहेत. गौरी-गणपती विसर्जनाचा दिवस अनेकांना भावूक करणारा दिवस असतो. 5-7 दिवस बाप्पाच्या सेवेमध्ये घालवल्यानंतर त्यांना निरोप देताना अनेकांचं अंतकरण जड होते. पण आजच्या दिवशी गणेशभक्तांना बाप्पांना निरोप देतानाचा हा दिवस थोडा सुसह्य करण्यासाठी तुम्ही नातलगांना, मित्रमंडळींना, आप्तांना यंदाच्या गणेश विसर्जनाचे मेसेजेस (Ganesh Visarjan Messages) सोशल मीडीयात व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स (WhatsApp Status), फेसबूक मेसेजेस (Facebook Messages), Quotes द्वारा शेअर करायला विसरू नका. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचं आवाहन करताना गणेश विसर्जन देखील घरच्या घरी करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे सुरक्षित वातावरणात ऑनलाईन माध्यमातून तुम्ही गणेश विसर्जन अनुभवणार असाल तर या व्हर्च्युअल सेलिब्रेशनची सांगता देखील ऑनलाईन मेसेज पाठवूनच करा.

पूर्वी गणेशोत्सव विसर्जनाला मिरवणूक,ढोल-ताशांच्या गजरात नाच-गाणी करत तासन तास विसर्जन मिरवणूकीमध्ये तल्लीन होत बाप्पाला निरोप दिला जात असे पण आता यावर्षी सलग दुसर्‍यांदा सारेच गणेशभक्त ती धूम 'मिस' करणार आहेत. पण कोरोना संकटासह इतरही सार्‍या दु:खांचा विनाश करून पुढील वर्षी बाप्पा लवकर येऊ दे या कामनेसह यंदा बाप्पाला निरोप द्या. (नक्की वाचा: Ganesh Visarjan 2021 Status: गणपती विसर्जन निमित्त मराठी Images, Greetings, Quotes शेअर करुन द्या बाप्पाला निरोप!)

गणेश विसर्जन मेसेजेस

गणपती बाप्पा मोरया

पुढच्या वर्षी लवकर या!

Ganesh Visarjan| File Images

डोळ्यात आले अश्रू

बाप्पा आम्हाला नका विसरु..

आनंदमय करुन चालले तुम्ही,

पुढल्या वर्षाची वाट पाहू आम्ही..

गणपती बाप्पा मोरया

पुढच्या वर्षी लवकर या!

Ganesh Visarjan| File Images

गणेश विसर्जनाच्या दिवशी मंगलमूर्ती

तुमच्या आयुष्यातील सारी दु:ख, वेदना

घेऊन जावो! हीच आमची कामना

बाप्पा मोरया !

Ganesh Visarjan| File Images
Ganesh Visarjan| File Images

रिकामं झालं घर, रिता झाला मखर

पुढल्या वर्षी लवकर येण्यास

निघाला आमचा लंबोदर!

Ganesh Visarjan| File Images

क्षण निरोपाचा जवळ आला

का घेत आहेस तू निरोप माझ्या मायबापा,

मनात घर करुन तू सोडून निघालास..

गणपती बाप्पा मोरया!

Ganesh Visarjan| File Images

घरगुती आणि सार्वजनिक पाच दिवसांचे गणपती बाप्पा, गौरी -गणपतींचे विसर्जन यंदा एकत्रच आज होणार आहे. शाडूच्या किंवा पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा पर्याय निवडण्याचं आवाहन यंदा अनेकांनी स्वीकारलं असल्याने यावर्षी देखील घरातच बाप्पाला निरोप देणं शक्य होणार आहे. सरकारी नियमांनुसार बाप्पाला निरोप देताना भव्य मिरवणूका काढण्यास बंदी आहे. तसेच मुंबई-पुण्यात कलम 144 लागू असल्याने 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यास परवानगी नसेल.