
Ganpati Visarjan 2020 Message in Marathi: महाराष्ट्राची शान असलेल्या गणेशोत्सवाचे लवकरच 10 दिवस पूर्ण होतील आणि अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाला निरोप देऊन उत्सवाची सांगता होईल. यंदा 1 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असून या दिवशी सार्वजनिक मंडळांसह 10 दिवसांच्या घरगुती बाप्पांचे विसर्जन करण्यात येईल. गेले 10 दिवस गणपती बाप्पाची पूजा, आरती, नैवेद्य यात रमलेल्या गणेशभक्तांसाठी निरोपाचा क्षण नक्कीच हळवा आहे. मात्र त्यासोबतच पुढच्या वर्षी बाप्पा लवकरच येतील अशी आसही मनाला आहे. यंदा बाप्पाला निरोप देताना त्याचे शुभआशीर्वाद आपल्या कुटुंबावर, परीवारावर, मित्रमंडळींवर कायम राहावेत यासाठी तुम्ही त्यांना गणेश विसर्जनाच्या खास शुभेच्छा देऊ शकता. यासाठी मराठी शुभेच्छा संदेश, मेसेजेस, ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्र, HD Images, Wallpapers फेसबुक, ट्विटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन देऊन अनंत चतुर्दशीचा दिवस मंगलमय करा.
यंदा कोविड-19 संकटामुळे विसर्जन मिरवणूकांची धूम अनुभवता येणार नाही. अगदी साध्या पद्धतीने, सोशल डिस्टसिंगचे नियम पाळून यंदा बाप्पाला निरोप दिला जाईल. त्यामुळे 'गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या' असा नाद सर्वत्र मोठ्या प्रमाणावर निनादणार नाही. मात्र व्हर्च्युअल शुभेच्छा पाठवून तुम्ही तो अनुभव घेऊ शकता. आपण केलेली वेडीवाकडी सेवा बाप्पा गोड मानून घेईल आणि आपल्याला आशीर्वाद देऊन पुढील वर्षी पुन्हा येण्यासाठी बाप्पा आपला निरोप घेईल. (गणपती विसर्जन कसे करतात? जाणून घ्या उत्तर पूजा विधी ते व्हर्च्युअल गणेश विसर्जनाचे प्लॅन्स!)
अनंत चतुर्दशी- गणपती विसर्जन मेसेजेस!
वंदितो तूज चरण,
आर्जव करितो गणराया...
वरदहस्त असूद्या माथी,
राहुद्या सदैव छत्रछाया...
बाप्पा मोरया!

निरोप देतो आता
देवा आज्ञा असावी
चुकले आमचे काही देवा
क्षमा असावी...
गणपती बाप्पा मोरया!

आभाळ भरले होते तू येताना
आता डोळे भरून आले तुला निरोप देताना...
गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या!

क्षण निरोपाचा जवळ आला
का घेत आहेस तू निरोप माझ्या मायबापा,
मनात घर करुन तू सोडून निघालास..
गणपती बाप्पा मोरया!

डोळ्यात आले अश्रू
बाप्पा आम्हाला नका विसरु..
आनंदमय करुन चालले तुम्ही,
पुढल्या वर्षाची वाट पाहू आम्ही..
गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या!

यंदा कोरोनाच्या सावटामुळे कृत्रिम तलावात किंवा घरच्या घरी घरगुती बाप्पांचे विसर्जन करण्याकडे अनेकांचा कल असेल. मिरवणूका, ढोल ताशे नसल्याने बाप्पाला यंदा अगदी साध्या पद्धतीने निरोप देण्यात येईल. मात्र बाप्पा जाताना तुमची सारी दुःख, निराशा, त्रास घेऊन जावो आणि तुमच्यावर शुभआशीर्वादांचा वर्षाव करो! याच अनंत चतुर्दशी निमित्त शुभेच्छा!