Ganesh Chaturthi 2022 Rangoli Designs: गणेश चतुर्थी हा हिंदू संस्कृतीत दहा दिवस साजरा केला जाणारा पवित्र सण आहे. गणेशोत्सव सणाची तारीख जवळ आली आहे. यंदा 31 ऑगस्ट रोजी गणरायांचे आगमन होणार आहे. गणेशाच्या सुंदर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि दहा दिवस मनोभावे सकाळ संध्याकाळ आरती करून पूजा केली जाते. गणपतीची मूर्ती पाटावर ठेवली जाते. देवाचा अभिषेक केला जातो. लोक वैदिक स्तोत्रे आणि गणेश उपनिषद सारख्या धार्मिक ग्रंथांचे उच्चारण करतात आणि एकवीस मोदक लाडू आणि दुर्वा देवाला अर्पण केले जातात. दरम्यान, गणपती म्हंटल की उत्सव आणि उत्सवाच्या शुभ प्रसंगी रांगोळी आलीच, चिंता करू नका, आम्ही तुमच्यासाठी रांगोळी डिझाईनचे काही व्हिडीओ घेऊन आलो आहोत, बहुरंगी, मुक्त हस्त आणि ठिपक्यांची गणपती डिझाइन्स असे अनेक रांगोळी डिझाईन घेऊन आलो आहोत, पाहा [हे देखील वाचा: Lalbaugcha Raja 2022 First Look Date, Time: गणेश भक्तांना आज घेता येणार लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपती मूर्तीचे मुख दर्शन]
भारतीत कोणत्याही शुभ सण असल्यास आणि दररोजही मुख्य प्रवेशद्वारा समोर सुंदर रांगोळी काढण्याची पद्धत आहे. घरासमोरचे अंगण रांगोळ्यांनी सजविल्याशिवाय अपूर्ण वाटते. वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळी काढल्या जातात. रांगोळी घरात आनंद, सकारात्मकता आणि जिवंतपणा आकर्षित करते असे मानले जाते. म्हणून, गणेश चतुर्थी सारखा पवित्र सणानिमित्त सुंदर गणपती बाप्पाची रांगोळी किंवा फुल इत्यादी तुम्ही काढू शकतात. या वर्षीच्या गणेश चतुर्थी उत्सवाच्या रांगोळीच्या तयारीसाठी खालील ट्यूटोरियल व्हिडिओ पहा! [हे देखील वाचा: Ganpati Invitation Card Messages in Marathi: गणेशोत्सवात प्रियजणांना घरी आमंत्रित करण्यासाठी WhatsApp Messages, Images च्या माध्यमातून शेअर करा या 'निमंत्रण पत्रिका']
गणेश उत्सव २०२२ साठी आकर्षक फ्रीहँड रांगोळी डिझाईन
गणेश उत्सव २०२२ साठी आकर्षक फ्रीहँड रांगोळी डिझाईन
गणेश उत्सव २०२२ साठी आकर्षक फ्रीहँड रांगोळी डिझाईन
गणेश उत्सव २०२२ साठी आकर्षक फ्रीहँड रांगोळी डिझाईन
गणेश उत्सवाच्या दहा दिवसांमध्ये रांगोळी अनेकांना आवडते. परंतु रांगोळीचे वैज्ञानिक महत्व म्हणजे रांगोळी तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्या चुनखडीमुळे कीटक घरात प्रवेश करत नाही. थोडक्यात, वैज्ञानिक कारणास्तव, प्रत्येक प्रसंगी रांगोळी काढणे गरजेचे मानले जाऊ लागले. म्हणून, व्हिडिओंमधून प्रेरणा घ्या आणि गणपती बाप्पाचे स्वागत करण्यासाठी घरासमोर सुंदर रांगोळी काढा!