
Gandhi Jayanti 2021 Quotes: येत्या 2 ऑक्टोंबरला देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 152 वी जयंती साजरी केली जाणार आहे. अशातच सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने चालणाऱ्या आणि इंग्रजांच्या तावडीतून भारताला आझादी मिळवून देण्यासाठी गांधीजी यांनी फार मोठे योगदान दिले आहे. भारताच्या स्वतंत्रता संग्राम मधील सर्वाधिक प्रमुख नेत्यांमधील गांधी यांना लोक प्रेमाने बापू असे संबोधित करत. गांधीजींनी लोकांच्या अधिकारासाठी निडरपणे लढाई लढली. आपल्या महान आणि सकारात्मक विचारांमुळे संपूर्ण जगाला प्रभावित करणाऱ्या या महापुरुषाचा जन्म 2 ऑक्टोंबर 2869 रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला होता. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे आहे.
महात्मा गांधी हे फक्त स्वतंत्र सेनानी नव्हेच तर त्यांना कर्मयोगी आणि युगपुरुष म्हणून ही ओळखले जाते. तर यंदाच्या गांधी जयंती निमित्त महात्माजींचे 'हे' काही प्रेरणादायी विचार देतील आयुष्याला नवी उमेद.(Dry Day in India on Gandhi Jayanti: ड्राय डे, 2 ऑक्टोबरला भारतभर बार, पब्ज आणि हॉटेलमध्ये मद्यविक्री बंद, दुकानातही मिळणार नाही दारु)






इंग्रजांच्या विरोधात महात्मा गांधी यांनी संपूर्ण देशवासियांना एकजूट करत स्वतंत्रता संग्रामच्या दरम्यान, दांडी मार्च किंवा मीठाचा सत्याग्रह, सविनय अज्ञात आंदोलन आणि भारत छोडो आंदोलन सुद्धा केले. या सर्व चळवळींमध्ये, भारत छोडो चळवळीने ब्रिटिश राजवटीचा पाया हादरवून टाकला आणि ब्रिटिशांना भारत सोडून परतण्यास भाग पाडले गेले. त्याच्या हालचालींमुळे देश 15 ऑगस्ट 1947 रोजी गुलामगिरीच्या बंधनातून मुक्त झाला.