
Gajanan Maharaj Prakat Din 2022 HD Images: शेगावचे गजानन महाराज प्रकट आज (23 फेब्रुवारी) साजरा केला जात आहे. महाराजांच्या जन्मस्थानाबाबत कोणाला विशेष माहिती नाही. मात्र, 23 फेब्रुवारी 1878 मध्ये त्यांचे प्रथम दर्शन झाल्याचे सांगण्यात येते. महाराजांचे दर्शन झाले त्या दिवशी माघ वद्य सप्तमी होती. महाराज याच दिवशी बुलढाणा येथे दर्शन झाले. दर्शन झाले त्या दिवशी महाराज दिगंबरावस्थेत होते असेही सांगितले जाते. महाराजांचे दर्शन पहिल्यांदा ज्या दिवशी झाले तो दिवस त्यांचा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस म्हणजेच माघ वद्य सप्तमी. गजानन महाराज यांच्या प्रकट दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही येथे काही HD Images, Wallpapers, Greetings देत आहोत. ज्या आपण सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram), टेलिग्राम (Telegram) वरुन शेअर करुन भक्तांचा दिवस मंगलमय करु शकता.
शेगाव येथील गजानन मंदिरात शेगाव येथील मंदिरात मोठा उत्सव साजरा होतो. प्रामुख्याने पादुका पूजन, पालखी यांसारखे विविध कार्यक्रम पार पडतात. राज्य आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून महाराजांच्या दर्शनासाठी लोक बुलढाण्यातील शेगाव येथे दाखल होतात. केवळ शेगावच नव्हे तर विविध ठिकाणी असलेल्या महाराजांच्या मठातही मोठमोठे कार्यक्रम साजरे केले जातात. (हेही वाचा, Sant Gadge Baba Jayanti 2022: संत गाडगेबाबा जयंती निमित्त WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करा प्रेरणादायी विचार)





गजानन महाराज यांचा 'गण गण गणात बोते' हा मंत्र प्रसिद्ध आहे. त्यांच्याकडून या मंत्राचा जप अखंड चालत असे. त्यामुळे त्यांना 'गजनान महाराज' म्हणून ओळखले जाते असे सांगतात. 'शेगावीचे संत' म्हणूनही त्यांना ओळखले जाते.