Vivah Muhurat 2024: नवीन वर्ष 2025 लवकरच सुरू होणार आहे. इंग्रजी कॅलेंडरनुसार नवीन वर्षाचा पहिला महिना जानेवारी असतो. नवीन वर्षाच्या प्रारंभासह, लोक येत्या काही महिन्यांत शुभ मुहूर्तावर विवाह आणि इतर शुभ कार्ये करतात. हिंदू धर्मातील सर्व 16 संस्कारांपैकी विवाह हा सर्वात महत्त्वाचा संस्कार मानला जातो. वैदिक ज्योतिषात कोणतेही शुभ कार्य करताना शुभ मुहूर्ताचा विचार केला जातो.
शुभ काळात केलेले शुभ कार्य यशस्वी आणि चांगले मानले जाते. दुसरीकडे शुभ कार्यात शुभ मुहूर्ताचा विचार केला नाही तर कामात विविध प्रकारचे अडथळे निर्माण होतात, असं म्हटलं जातं. वैदिक शास्त्रामध्ये विवाह हे पवित्र नाते मानले गेले आहे. लग्नासारखे शुभ कार्य नेहमी शुभ मुहूर्तावर करणे आवश्यक आहे. लग्नात कुंडली जुळण्यावर आणि लग्नाच्या शुभ तारखांवर विशेष लक्ष दिले जाते. हिंदू कॅलेंडरनुसार 2025 मध्ये लग्नासाठी अनेक शुभ मुहूर्त आहेत. 2025 मध्ये जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत लग्नासाठी शुभ मुहूर्त कधी आहेत ते जाणून घेऊयात...
जानेवारी महिन्यात लग्नासाठी 10 शुभ दिवस -
- 16 जानेवारी 2025, गुरुवार
- 17 जानेवारी 2025, शुक्रवार
- 18 जानेवारी 2025, शनिवार
- 19 जानेवारी 2025, रविवार
- 20 जानेवारी 2025, सोमवार
- 21 जानेवारी 2025, मंगळवार
- 23 जानेवारी 2025, गुरुवार
- 24 जानेवारी 2025, शुक्रवार
- 26 जानेवारी 2025, रविवार
- 27 जानेवारी 2025, सोमवार
फेब्रुवारीमध्ये लग्नासाठी 14 शुभ दिवस -
- 2 फेब्रुवारी 2025, रविवार
- 3 फेब्रुवारी 2025, सोमवार
- 6 फेब्रुवारी 2025, गुरुवार
- 7 फेब्रुवारी 2025, शुक्रवार
- 12 फेब्रुवारी 2025, बुधवार
- 13 फेब्रुवारी 2025, गुरुवार
- 14 फेब्रुवारी 2025, शुक्रवार
- 15 फेब्रुवारी 2025, शनिवार
- 16 फेब्रुवारी 2025, रविवार
- 18 फेब्रुवारी 2025, मंगळवार
- 19 फेब्रुवारी 2025, बुधवार
- 21 फेब्रुवारी 2025, शुक्रवार
- 23 फेब्रुवारी 2025, रविवार
- 25 फेब्रुवारी 2025, मंगळवार
मार्च महिन्यात लग्नासाठी 5 शुभ दिवस -
- 2 मार्च 2025, रविवार
- 6 मार्च 2025, गुरुवार
- 7 मार्च 2025, शुक्रवार
- 12 मार्च 2025, बुधवार
- 13 मार्च 2025, गुरुवार
एप्रिलमध्ये लग्नासाठी 10 दिवसांचा शुभ मुहूर्त -
- 14 एप्रिल 2025, सोमवार
- 16 एप्रिल 2025, बुधवार
- 17 एप्रिल 2025, गुरुवार
- 18 एप्रिल 2025, शुक्रवार
- 19 एप्रिल 2025, शनिवार
- 20 एप्रिल 2025, रविवार
- 21 एप्रिल 2025, सोमवार
- 25 एप्रिल 2025, शुक्रवार
- 29 एप्रिल 2025, मंगळवार
- 30 एप्रिल 2025, बुधवार
मे महिन्यात लग्नासाठी 15 शुभ दिवस -
- 1 मे 2025, गुरुवार
- 5 मे 2025, सोमवार
- 6 मे 2025, मंगळवार
- 8 मे 2025, गुरुवार
- 10 मे 2025, शनिवार
- 14 मे 2025, बुधवार
- 15 मे 2025, गुरुवार
- 16 मे 2025, शुक्रवार
- 17 मे 2025, शनिवार
- 18 मे 2025, रविवार
- 22 मे 2025, गुरुवार
- 23 मे 2025, शुक्रवार
- 24 मे 2025, शनिवार
- 27 मे 2025, मंगळवार
- 28 मे 2025, बुधवार
जूनमध्ये लग्नासाठी 5 शुभ दिवस -
- 2 जून 2025, सोमवार
- 4 जून 2025, बुधवार
- 5 जून 2025, गुरुवार
- 7 जून 2025, शनिवार
- 8 जून 2025, रविवार
जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये लग्नासाठी शुभ मुहूर्त नाहीत.
नोव्हेंबरमध्ये लग्नासाठी 14 शुभ दिवस आहेत.
- 2 नोव्हेंबर 2025, रविवार
- 3 नोव्हेंबर 2025, सोमवार
- 6 नोव्हेंबर 2025, गुरुवार
- 8 नोव्हेंबर 2025, शनिवार
- 12 नोव्हेंबर 2025, बुधवार
- 13 नोव्हेंबर 2025, गुरुवार
- 16 नोव्हेंबर 2025, रविवार
- 17 नोव्हेंबर 2025, सोमवार
- 18 नोव्हेंबर 2025, मंगळवार
- 21 नोव्हेंबर 2025, शुक्रवार
- 22 नोव्हेंबर 2025, शनिवार
- 23 नोव्हेंबर 2025, रविवार
- 25 नोव्हेंबर 2025, मंगळवार
- 30 नोव्हेंबर 2025, रविवार
डिसेंबरमध्ये लग्नासाठी 3 शुभ दिवस असतील.
- 4 डिसेंबर 2025, गुरुवार
- 5 डिसेंबर 2025, शुक्रवार
- 6 डिसेंबर 2025, शनिवार
हिंदू कॅलेंडरनुसार वर्षातील काही महिने लग्नासाठी खूप चांगले मानले जातात तर काही महिने निषिद्ध मानले जातात. जेव्हा वधू आणि वराच्या बाजूने लग्न निश्चित केले जाते, तेव्हा दोन्ही कुटुंबातील सदस्य लग्नासाठी योग्य मुहूर्त आणि वेळ शोधतात.