Ekdant Sankashti Chaturthi 2021: आज संकष्टी चतुर्थी; जाणून घ्या व्रत, विधी आणि चंद्रोदयाची वेळ
Sankashti Chaturthi HD Images (Photo Credits: File)

आज मे महिन्यातील संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi) आहे. या संकष्टीला एकदंत संकष्टी चतुर्थी (Ekdant Sankashti Chaturthi) म्हणून देखील ओळखलं जातं. या दिवशी गणरायाची पूजा अर्चना केली जाते. हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभ कामाची सुरूवात ही गणेश पूजनाने होते. दरम्यान संकष्टी चतुर्थीचा अर्थच आहे मूळात संकटाला हरण करणारा दिवस त्यामुळे गणेशभक्त संकष्टीचं व्रत करताना सार्‍या दु:खांचा नाश व्हावा अशी प्रार्थना करतात. दिवसभर उपवास करून संध्याकाळी चंद्रोदयानंतर (Moon Rise Timings) बाप्पाची पूजा करून व्रत सोडण्याची प्रथा आहे. नक्की वाचा: Sankashti Chaturthi Wishes: संकष्टी चतुर्थी च्या मराठी शुभेच्छा Messages, Whatsapp Status च्या माध्यमातुन देत करा गणरायला वंंदन.

दरम्यान प्रत्येक महिन्यात दोनदा चतुर्थी येते पण पौर्णिमेनंतर येणारी चतुर्थी ही संकष्टी चतुर्थी असते तर अमावस्येनंतर येणारी विनायकी चतुर्थी असते. संकष्टीला एका दिवसाचा उपवास आणि गणपती बाप्पाची विधीवत पूजा करण्याची प्रथा आहे. मग तुमचा देखील आज उपवास असेल तर जाणून घ्या मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर मध्ये आज चंद्रोदयाची वेळ काय?

मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर चंद्रोदय वेळ

मुंबई - 22.27

पुणे- 22.22

नाशिक- 22.25

नागपूर-22.06

रत्नागिरी- 22.21

उपवास करणं शक्य नसलेल्या व्यक्ती आजच्या दिवशी बाप्पाला दुर्वा, जास्वंद अर्पण करून गणपती स्त्रोताचं पठण करून पूजा अर्चा करू शकतात. या दिवशी बाप्पाच्या नैवेद्यामध्ये मोदकांचा समावेश केला जातो. कांदा-लसुण विरहित जेवणाच्या नैवेद्याने अनेकजण आजच्या दिवशी गणरायाची पूजा करतात आणि सुख, समृद्धी, शांती साठी प्रार्थना करतात.