Ramzan Eid 2024: रमजान (Ramzan) चा महिना सुरू होताच लोक ईद (Eid ul Fitr 2024) ची आतुरतेने वाट पाहू लागतात. इस्लाम धर्मात रमजान महिना अत्यंत पवित्र मानला जातो. यानंतर येणारी एक ईद-उल-फित्र (Eid ul Fitr) म्हणून ओळखली जाते. हा सण शव्वाल अर्धचंद्र पाहण्यावर अवलंबून असतो. ईद उल फितर देखील रमजान महिन्याच्या शेवटी चिन्हांकित करते. त्यामुळे भारतात ईद कधी साजरी होणार हे जाणून घेऊयात.
ईद-उल-फित्र कधी असतो?
सौदी अरेबियामध्ये चंद्र कधी दिसणार यावर भारतातील ईदची तारीख अवलंबून असते. सौदी अरेबियानंतर भारतात ईद साजरी केली जाते. सौदी अरेबियामध्ये 8 एप्रिल रोजी चंद्र दिसत नसला तरी तेथे बुधवारी, 10 एप्रिल 2024 रोजी ईद साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भारतात ईदचा सण एका दिवसानंतर म्हणजेच 11 एप्रिल 2024 रोजी गुरुवारी साजरा केला जाईल. (वाचा - Ramzan Eid 2024 Mehndi Designs: ईद सणाला काढता येतील अशा सुंदर मेहेंदी डिझाईन, पाहा व्हिडीओ)
ईद कशी साजरी केली जाते?
ईदच्या दिवशी सकाळी मुस्लीम समाजाचे लोक साफसफाई करतात. नवीन कपडे परिधान करतात आणि ईदची नमाज अदा करण्यासाठी मशिदीत जातात. यानंतर ते एकमेकांना मिठी मारून ईदच्या शुभेच्छा देतात. तसेच यावेळी मिठाई, शेवया इत्यादी विविध पदार्थांनी एकमेकांची तोंडे गोड केली जातात.
ईद हा सण बंधुभावाचे प्रतिक मानला जातो. या दिवशी मुस्लिम लोक नमाजद्वारे अल्लाहचे आभार मानतात. तसेच या दिवशी गरजूंना जेवण, कपडे व इतर आवश्यक गोष्टींचे वाटपही केले जाते.