
Eid Mubarak 2021 Messages: रमजान म्हणजे 'बरकती' आणि ईद म्हणजे 'आनंद'. मनामनातील दरी कमी करुन परस्परांमध्ये स्नेहभाव वाढविणारा हा महिना. ह्याच महिन्यात हजरत मोहम्मद पैगंबरांना त्यांच्या अखंड साधनेचे, खडतर तपश्चर्येंचे फळ मिळाले. अर्थात त्यामुळे त्यांना अल्लाह (मुस्लिमांचा देव) चे दर्शन झाले. मोहम्मद पैगंबर हे इस्लाम धर्माचे संस्थापक होते. इस्लामच्या धारणेनुसार अल्लाहने त्यांच्यामार्फत कुराण हा धर्मग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवला असे सांगितले जाते. रमजान ईद (Ramzan Eid) या दिवसाला 'ईद-उल-फित्र' (Eid al-Fitr) असेही म्हणतात. यंदा हा सण 14 मे रोजी सर्वत्र साजरा केला जाईल. या दिवशी सर्वजण एकमेकांना शुभेच्छा पाठवू शकता.
रमजान ईद दिवशी मुस्लिम बांधव एकमेकांना गळाभेट देऊन एकमेकांना ईदी देतात. यंदा कोरोनामुळे आणि सोशल डिस्टंसिंगचे महत्व लक्षात आपण घरात राहूनच हा सणा साजरा करू शकतो. तसेच सोशल मिडियाद्वारे आपण एकमेकांना शुभेच्छा संदेशही पाठवू शकतो.
माझ्या सर्व मुस्लिम बांधवाना
रमजान ईद च्या मनापासून
हार्दिक शुभेच्छा...
अल्लाह ताला आपकी जिंदगी की हर ख्वाईश,
हर तमन्ना, हर आरजू, हर खुशी, पुरी कराये…
आमीन!
ईद मुबारक!

धर्म, जात यापेक्षाही मोठी
असते शक्ती माणुसकीची...
एकमेकांची गळाभेट घेऊन
शुभेच्छा देऊयात रमझान ईद ची
ईद मुबारक!

ईद घेऊन येई आनंद
जोडू मनामनांचे बंध
सणाचा हा दिवस खास
ईद मुबारक तुम्हा सर्वांस
रमजान ईद मुबारक!

यंदाची रमजान ईद तुम्हांला आणि तुमच्या परिवाराला
सुख, शांती, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो
हिच आमची सदिच्छा
ईद उल-फ़ित्र च्या हार्दिक शुभेच्छा!

रमजानचे पावित्र्य आणि शुभ महिना संपल्यानंतर चंद्रदर्शन होताच शौव्वाल या महिन्याची पहिली तारीख सुरु होते. हा दिवस रमजान ईद म्हणून साजरा केला जातो. या दिवसी दानधर्म केले जाते. ईदच्या दिवशी सकाळी प्रार्थना झाल्यानंतर प्रथम दहिभात आणि साखर यांचे जेवण होते. त्याचवेळी खारीक खाण्याचीही पद्धत आहे. कारण मोहम्मद पैगंबर व त्यांच्या कुटुंबातील लोकांना हाच पदार्थ मुख्यत्वे उपलब्ध होता, अशी समजूत आहे. दुधात शेवया टाकून खीर खाण्याची आणि इतरांना खाऊ घालण्याचीही पद्धत आहे. या वेळी मिठाई आणि शीर खुरमा आवर्जून दिला जातो.