Eid-ul-Fitr 2020 Date in India: केरळ आणि कर्नाटक वगळता भारतामध्ये आज इस्लामिक धर्मियांचा पावित्र रमजान महिन्याचा 29 वा रोजा ठेवला जाणार आहे. आज रात्री चंद्र पाहिला जाणार आहे. इस्लामिक कॅलेंडर चंद्रांच्या कलांवर अवलंबून असते. अशामध्ये 29 दिवसांचा महिना देखील असू शकतो. जर आज रात्री चंद्र दिसला तर रविवारी ईद साजरी केली जाईल. तसे न झाल्यास सोमवार 25 मे दिवशी भारतामध्ये रमजान ईदचा सोहळा साजरा होणार आहे. आज संध्याकाळी तुम्ही चांदच्या दिदारचे सारे अपडेट्स लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून पाहू शकता.
दरम्यान शुक्रवार, 22 मे दिवशी सौदी अरेबिया मध्ये चंद्र पाहण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र तो दिसला नाही. यामध्ये दक्षिणेकडील राज्यांचा म्हणजेच केरळ आणि कर्नाटकाचादेखील समावेश आहे. या ठिकाणी ईद राविवार 24 मे दिवशी साजरी केली जाणार आहे.
मुस्लिम बांधव रमजान महिन्यात रोजे ठेवतात आणि 30 व्या दिवशी रमजान ईद हा मोठा सोहळा आनंदामध्ये साजरा करतात. रमजान नंतर शव्वाल महिना सुरू होतो. यंदा रमजान ईद वर जगभरामध्ये कोरोना व्हायरसचं संकट आहे. दरम्यान या ईदचा सोहळा साजरा करताना प्रार्थनास्थळं किंवा सामुहिकरित्या एकत्र न जमण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घरच्या घरीच प्रियजनांसोबत ईद साजरी करा असं सरकारकडून आवाहन करण्यात आलं आहे.