Eid Milad-un Nabi Mubarak 2023 Messages: ईद-ए-मिलाद-उन-नबी (Eid Milad-un Nabi) हा सण रबी अल-अवाल महिन्याच्या 12 तारखेला साजरा केला जातो. 16 सप्टेंबर 2023 रोजी रबी उल अव्वल महिन्याचा चंद्र दिसला आहे. म्हणजे 17 सप्टेंबर 2023 हा रबी उल अव्वल महिन्याचा पहिला दिवस आहे. रबी उल अव्वल महिन्याचा 12 वा दिवस 28 सप्टेंबर 2023 आहे. ईद मिलाद-उन-नबी हा पैगंबर मोहम्मद यांच्या जन्मदिवसाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.
हा उत्सव मोहम्मद साहिबांच्या जीवनाची आणि शिकवणीची आठवण करून देतो. मिलाद-उन-नबी हा इस्लामी महिन्यातील तिसरा महिना रबी-उल-अव्वलच्या 11व्या आणि 12व्या दिवशी साजरा केला जातो. मोहम्मद साहेबांनी अल्लाहच्या आदेशाने जो धर्म सुरू केला त्याला इस्लाम म्हणतात. या दिवशी मुस्लिम बांधव एकमेकांना ईद मुबारकच्या शुभेच्छा देतात. ईद ए मिलाद उन नबीनिमित्त Facebook, WhatsApp Status, Greetings, SMS, Images द्वारे तुम्ही मुस्लिम बांधवांना खास मराठमोळ्या ईद मुबारकच्या शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.
सर्व मुस्लिम बांधवांना
ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त
मनःपूर्वक शुभेच्छा…
ईद मुबारक!
धर्म, जात यापेक्षाही मोठी
असते शक्ती माणुसकीची…
एकमेकांची गळाभेट घेऊन
शुभेच्छा देऊ ईद ची
ईद-ए-मिलाद-उन-नबी मुबारक!
ईद निमित्त तुम्हाला सर्वांना
आनंद आणि ऐश्वर्य लाभो
ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त
सर्वांना खूप खूप शुभेच्छा
ईद मुबारक!
ईद घेऊन येई आनंद
जोडू मनाशी मनाचे नवे बंध
ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त
सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
माझ्या सर्व मुस्लिम बांधवाना
ईद-ए-मिलाद-उन-नबी च्या खूप खूप शुभेच्छा...
अल्लाह ताला आपकी जिंदगी की हर ख्वाईश,
हर तमन्ना, हर आरजू, हर खुशी, पुरी कराये…
आमीन!
ईद मुबारक!
मिलाद-उन-नबीचा पहिला सार्वजनिक उत्सव 11 व्या शतकाच्या उत्तरार्धात इजिप्तमध्ये झाला. हा मुख्यतः शिया शासक वर्गाचा सण होता. उत्सवांमध्ये कुराण पठण, प्राण्यांचे बलिदान, सार्वजनिक प्रवचन आणि मेजवानी यांचा समावेश आहे.