Photo Credit : Instagram

Tulsi Vivah Easy Rangoli Design: तुळस (Tulsi) हे सर्वात पवित्र मानले जाणारे पान आहे. म्हणून कोणत्याही शुभकार्यात, धार्मिक विधीत तुळस ही आर्वजून वापरण्यात येते. तसेच तुळशीचे  लग्न ही तेवढेच पवित्र मानले जाते.यंदा तुळशी विवाह २६ नोव्हेंबर पासून सुरु होणार आहे म्हणजेच यंदा 26 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत तुळशी विवाह करता येईल. कोणताही शुभ कार्यक्रम , सण असला की रांगोळी काढलीच जाते.अशा वेळी रांगोळी काढणे शुभ मानले जाते. तसेच तुळशी विवाहाच्या दिवशी ही तुळशी भोवती , दारासमोर छान रांगोळी काढली जाते. पण बऱ्याचदा रांगोळीची  कमी वेळात आणि छान तुडिझाईन आठवत नाही.तुम्ही ही यंदा तुळशीचे विवाहाच्या दिवशी कोणती रांगोळी या संभ्रमात असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत खास तुळशी विवाहाला काढता येतील अशा सुंदर रांगोळी डिझाईन. (Tulsi Vivah 2020 Marathi Invitation Card: तुलसी विवाह आमंत्रण WhatsApp Messages, Images द्वारा शेअर करत आप्तेष्टांना द्या तुळशीच्या लग्नाचं निमंत्रण )

तुळशी विवाह स्पेशल रांगोळी डिझाईन 

चमचाच्या सहाय्याने काढलेली तुळशी विवाह रांगोळी

ट्रेडिशनल तुळशी विवाह रांगोळी 

अशी काढा रांगोळीतून तुळस डिझाईन

तेव्हा तुळशी विवाहाच्या दिवशी या सुंदर आणि आकर्षक रांगोळी डिझाईन नक्की काढा.असे म्हणतात की, तुळशीच्या वनस्पतीत मुळापासून अग्रापर्यंत सर्व देवता वास्तव्य करतात. त्यामुळे अशा या तुळशीचे रोप ज्या घरात वास असतो, त्या घरात लक्ष्मी, सुख-शांती, समृद्धी गुण्यागोविंदाने नांदतात असे पुराणात सांगितले आहे.