Dr. BR Ambedkar Mahaparinirvan Din 2019 | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

Unknow  Facts About Dr B. R. Ambedkar: देशभरातील आणि जगभरातील डॉ. आंबेडकर (Dr. BR Ambedkar) अनुयायी आज (6 डिसेंबर 2019) मुबई येथील दादर चैत्यभूमी येथे उपस्थिती लावलीत. डॉ. आंबेडकर आनुयायी आणि समाजाती विविध घटकांसाठी आजचा दिवस फार महत्त्वाचा असतो. आजच्याच दिवशी म्हणजेच 6 डिसेंबर 1956 रोजी डॉ. बाबसाहे आंबेडकर यांचे निधन झाले. हा दिवस महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvan Din ) म्हणून ओळखला जातो. आपले ज्ञान, विचार आणि अखंड जीवन दिलीतांच्या उद्धारासाठी वाहिलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जणू एक महामानवच. ते केवळ एक व्यक्ती नव्हते तर, त्यांचे व्यक्तीमत्व अष्ठपैलू होते. एकाच वेळी ते विचारवंत तर होतेच परंतू, समाजसुधारक, राजकारणी, प्रभावी वक्ते, लेखक, अर्थतज्ज्ञ, नेता, संघटक, पत्रकार, संपादक, चळवळीचे प्रणेते असे ते बरेच काही होते. ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकारही आहेत. अशा या बहुआयामी व्यक्तीमत्वाच्या आयुष्याबाबत काही महत्त्वपूर्ण गोष्टी (Interesting Facts About Dr B. R. Ambedk) .

  1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे नाव भिमराव रामजी आंबेडकर असे आहे. 14 एप्रिल 1891 या दिवशी त्यांचा जन्म अतिशय गरीब आणि अस्पृश्य कुटुंबात झाला. तर, दिल्ली येथील निवासस्थानी 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे निधन झाले. अस्पृश्य म्हणून जन्माला आलो तरी अस्पृश्य म्हणून मरणार नाही हे त्यांनी घरे करुन दाखवले.
  2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या आईवडीलांचे चौदावे आणि अखेरचे अपत्य होते.
  3. डॉ. आंबेडकर यांचे आडनाव आंबावडेकर असे होते. मात्र, त्यांच्या शिक्षकांनी त्यात बदल करत आंबेडकर असे नाव लावले.
  4. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विदेशात जाऊन अर्थशास्त्र विषयात डॉक्टरेट (PhD) पदवी ग्रहण करणारे पहिले भारतीय होते.
  5. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवरही दखल घेतली गेली आहे. महत्त्वाचे असे की, लंडन येथील एका संग्रहालयात आंबेडकर यांची प्रतिमा कार्ल मार्क्स यांच्यासोबत लावण्यात आली आहे.
  6. भारताचा राष्ट्रध्वज असलेल्या तिरंग्यात अशोक चक्र लावण्याचे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाच जाते.
  7. भारतीय वंशाचे नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन हेसुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपले गुरु मानतात. (हेही वाचा, DR BR Ambedkar Mahaparinirvan Din 2019 Messages: 63व्या महापरिनिर्वाण दिन निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणारे मराठी मेसेजेस आणि WhatsApp Status)
  8. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तक संग्रहालयात त्यांची स्वत:ची 50,000 पेक्षाही अधिक पुस्तके होती. विशेष म्हणजे हे जगभरातील सर्वात मोठे खासगी पुस्ककालय होते.
  9. डॉ. बाबासाहेब आंबेडक यांनी लिहिलेला ग्रंथ “waiting for a visa” कोलंबिया विद्यापीठात टेक्स्टबुक आहे. कोलिंबिया विद्यापीठाने 2004 मध्ये जागतीक दर्जाच्या 100 विचारवंतांची एक यादी बनवली त्यात पहिले नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे होते.
  10. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तब्बल 64 विषयांत मास्टर होते. ते हिंन्दी, पाली, संकृत, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, मराठी, पार्शियन आणि गुजराती अशा 9 भाषांचे जाणकार होते. सर्व भाषांमध्ये त्यांना लिहिता वाचता आणि बोलताही येत असे. त्यांनी वयाच्या 21 व्या वर्षांपर्यंत जवळपास सर्व धर्मांचा तुलनात्मक अभ्यास केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतिंना अभिवादन करण्यासाठी देशविदेशातून लोक चैत्यभुमीवर येतात. आंबेडकर यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात कधीच देव परमेश्वर आणि पुरान मानले नाही. तसेच, कोणत्याही प्रकारच्या मूर्तीपूजेचा त्यांनी विरोधच केला. असे असले तरी आंबेडकर यांचे अनुयायी अनेकदा आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. तसेच, त्यांना परमेश्वराचा आवतारही मानतात. परंतू, हे सर्व डॉ. आंबेडकर यांच्या प्रति असलेला निस्सीम आदरच दाखवतात.