Laxmi Pujan 2020: दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चुकूनही करु नका 'ह्या' गोष्टी अन्यथा घरात पसरेल अंध:कार
Representational Image (Photo Credits: Sacred Hinduism/ Facebook)

Diwali 2020: दिवाळीत लक्ष्मीपूजनाचा (Laxmi Pujan 2020) हा दिवस हा खूप विशेष मानला जातो. मुख्य करुन नरक चतुर्दशीच्या दुस-या दिवशी हा सण येतो. मात्र यंदा नरक चतुर्दशी (Narak Chaturdashi) आणि लक्ष्मी पूजन (Laxmi Pujan) हे एकाच दिवशी आले आहेत. यामुळे लोकांमध्ये देखील प्रचंड उत्साह आहे. देवी लक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपादृष्टी राहावी आणि आपल्या घरात धनधान्यात खंड पडू नये यासाठी लक्ष्मीपूजनाची दिवशी देवीला प्रसन्न करण्यासाठी विशेष पूजा केली जाते. सण कुठलाही असो मात्र त्या सणामध्ये घरामध्ये देवदेवतांचा वावर असतो असे म्हणतात. त्यामुळे सणांच्या दिवशी घरात प्रसन्न वातावरण राहिल यासाठी प्रयत्न करा.

पुराणकथेनुसार लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्रीच्या वेळी लक्ष्मी सर्वत्र संचार करते. ज्या ठिकाणी स्वच्छता, सौंदर्य, आनंद, उत्साह अशा सकारात्मक बाबी असतात तेथे लक्ष्मी प्रसन्न होऊन आशीर्वाद देते. म्हणूनच या दिवशी पुढे दिलेल्या गोष्टी टाळाव्यात अन्यथा घरात अशांती पसरू शकते. हेदेखील वाचा- Diwali 2020 Homemade Sweets: दिवाळीत यंदा घरच्या घरी काजू कतली, कलाकंद, खजूर बर्फी यांसारखे पदार्थ बनवून तोंड करा गोड, Watch Recipes

1. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मांसाहार करु नये

2. मद्यपान करु नये

3. घरात भांडणं, वादविवाद करु नये

4. घराचे दरवाजे, खिडक्या आणि दिवे किमान रात्री 12 वाजेपर्यंत वा लक्ष्मीपूजनानंतर काही तास तरी बंद ठेवू नये.

5. लक्ष्मीपूजनाच्या वेळी नगद पैशांचा व्यवहार करु नये.

6. घरात तुमचे वडिधा-या माणसांशी तसेच घरातील अन्य मंडळीशी असभ्य वर्तन करु नये.

देवी माता आपल्या घरात कायम गुण्यागोविंदाने नांदावी यासाठी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या घरातील मुली, स्त्रिया यांचा आदर करावा. जमल्यास घरात चिमुकली असल्यास तिचेही यादिवशी औक्षण करावे.

 (टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. लेटेस्टली मराठी यातुन कोणतीही अंधश्रद्धा पसरवू इच्छित नाही. )